Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
चांगले हेतू पुरेसे नाहीत. आवश्यक परिणाम साधण्यासाठी, योग्य जाणिवेसह केलेली, योग्य कृती आवश्यक आहे.
जीवन म्हणजे संपूर्ण सहभाग. जिथे पूर्ण सहभाग नाही, तिथे जीवन नाही.
जर तुमच्या विश्वासाची कल्पना ही आहे, की इतरांनी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागलं पाहिजे, तर तो विश्वास नाही - तो धूर्तपणा आहे.
तुम्ही तुमच्या मनाला खेळवलं पाहिजे - तुमच्या मनाने तुम्हाला खेळवू नये.
मला माहित नाही' ही एक अफाट शक्यता आहे. जेव्हा तुम्हाला उमगतं की 'मला माहित नाही,' फक्त तेव्हाच जाणून घेण्याची ओढ, शोध आणि शक्यता निर्माण होते.
मला हे पाहायचं आहे की तुम्ही कशावरतरी एकाग्र झालेले आहात, ते काहीही असू दे. कारण जर मानव एकाग्र राहिला, तर विश्व त्याला अनुकूल होईल.
सर्वात महत्त्वाचं जे काही आहे, ते तुमच्या अंतरंगातच आहे.
आपल्याकडे जी काही कौशल्ये, क्षमता आणि प्रतिभा असतील - या सगळ्या तेव्हाच अर्थपूर्ण ठरतात, जेव्हा समतोल असतो.
शेती फक्त समृद्ध मातीवरच फुलू शकते - त्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. मातीचं पुनरुज्जीवन म्हणजेच जीवनाचं पोषण.
तुमच्या प्रणालीतला प्रत्येक सूक्ष्म कण संपूर्ण विश्वाशी सतत देवाणघेवाण करत असतात. केवळ तुम्हीच स्वतःला वेगळं अस्तित्व मानता.
तुमच्या अनुभवाची तीव्रता ही तुमच्या संपत्तीच्या विस्तारापेक्षा अधिक महत्त्वाची आहे.
तुम्हाला जेव्हा 'तुम्ही सध्या कुठे आहात' याबद्दल पूर्ण स्पष्टता असते, तेव्हा अनुभवाची पुढची पातळी स्वतःहूनच तुमच्यासाठी प्रकट होते.