FILTERS:
SORT BY:
तुम्हाला ज्या गोष्टींची काळजी आहे, त्याबद्दल खरोखरच समर्पित असाल, तर संपूर्ण जग तुम्हाला पाठिंबा देईल.
या जगात आपण कोण आहोत, हे काळ आणि परिस्थितीनुसार आकारास येतं. पण 'स्वतःच्या आत आपण कोण आहोत' हे त्या गोष्टींमुळे कधीही आकारास येऊ नये.
जीवनापेक्षा महान असा दुसरा कोणताही हेतू नाही.
जेव्हा तुम्ही क्रोध, द्वेष आणि मत्सर यांपासून मुक्त असता, तेव्हा तुम्ही ज्या कशाला स्पर्श करता, त्या वेळी त्याला प्रेमाने स्पर्श करता.
जर तुमची बुद्धिमत्ता तुमच्यासाठी काम करत असती, तर तुम्ही स्वतःला दुःखी करून घेतलं नसतं. तुम्ही तुमच्या आत सर्वोत्तम गोष्ट निर्माण केली असती - आणि बाहेर, सर्वोत्तम कामगिरी केली असती.
तुम्ही किती सखोलपणे सहभागी होता, त्यावरच जीवनाचा अनुभव किती सखोल असेल हे ठरते.
उद्या कशा प्रकारे घडेल हे, आज तुम्ही जीवनाबद्दल कसा विचार करता, ते कसे अनुभवता आणि कसे समजून घेता यावर अवलंबून असते.
Life is generous to those who know how to receive. Those who know how to make the most of it experience Fulfillment. On this Full Moon of Fulfillment, may you be open to life’s generosity.
तुम्ही किती काळ जगता यापेक्षा जीवनाची संपूर्ण क्षमता ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे.
ज्या जगात माहिती प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, तिथे शिक्षण हे केवळ ज्ञानाचा एक संग्रह न राहता, प्रेरणादायी बनले पाहिजे.
तुमच्या आत दोन मूलभूत शक्ती सतत कार्यरत असतात: आत्मसंरक्षण आणि विस्तारित होण्याची ओढ. एकदा का तुम्ही आत्मसंरक्षणाच्या सहजप्रवृत्तीला पार केले की, तुमच्या शरीरातली प्रत्येक पेशी आरामदायी स्थितीत येईल.
जर तुम्ही ऊर्जेचा उत्साह, मनाचा ताजेपणा आणि प्रेमळ हृदय जोपासले, तर मग प्रत्येक दिवस एक नवीन साहस आहे.