Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
जेव्हा तुम्ही खरोखर शरीराच्या आणि मनाच्या मर्यादांपलीकडे स्वतःला अनुभवाल, तेव्हा कोणतेही भय राहणार नाही.
माझा एकमेव हेतू हा आहे की, तुम्ही एका परिपूर्ण जीवन म्हणून फुलून यावं - जीवन हे याबद्दलच आहे.
जर एखाद्याने स्वतःच्या शरीराशी आणि मनाशी असलेली ओळख सोडून दिली, जी अन्न आणि संस्कार यांचा संचय आहे, तर त्याला आंतरिक स्थिरता जाणवेल. ध्यानमय होण्यासाठी एवढेच पुरेसे आहे.
मानवी शरीरापेक्षा मोठा रासायनिक कारखाना या पृथ्वीवर नाही. जर तुम्ही चांगले व्यवस्थापक असाल, तर त्यात आनंदाचं रसायन निर्माण करू शकता.
जर तुम्ही या जगाला तुमची आवड आणि नावड यामध्ये विभागलं, तर सत्य जाणून घेण्याबाबत तुम्ही असमर्थ ठराल.
जेव्हा तुमची मानवता पूर्णपणे प्रवाही असते, तेव्हा तुम्ही सभोवतालच्या जीवनासोबत जोडले जाता. ही नैतिकता नाही - हे मानवी हृदयाचं स्वरूप आहे.
या जीवनाबाबत काही समस्या नाहीये. समस्या ही आहे की, तुम्ही मनाचं नियंत्रण तुमच्या हातात घेतलेलं नाहीये.
आपलं इथलं अस्तित्व फक्त थोड्या कालावधीसाठी आहे. आपण एकमेकांशी लढून ते कमी करू नये.
एखादी परिस्थिती तेव्हाच तणावपूर्ण बनते , जेव्हा तुम्ही आसक्तीने प्रतिक्रिया देता.
गूढ अनुभवाचा शोध घेऊ नका. परिवर्तनाचा शोध घ्या.
प्रत्येक वेळी तुम्ही वेळ तपासता, तेव्हा लक्षात ठेवा, जीवन निघून जात आहे. खरोखर काय महत्वाचं आहे यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे.
हे जीवन जगण्याशिवाय इथं दुसरं काहीही नाही - तुमच्याकडे एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे उथळपणे किंवा सखोलपणे जगणे.