FILTERS:
SORT BY:
यश म्हणजे जेव्हा 'तुम्ही कोण आहात' हे परिस्थिती ठरवत नाही – तर ती परिस्थिती कशी असावी हे 'तुम्ही' ठरवता.
जीवन हे तुम्ही 'काय करता' याबद्दल नाही, तर तुम्ही ते 'कसे करता' याबद्दल आहे.
शिक्षणाला केवळ माहितीची नव्हे, तर प्रेरणेची आवश्यकता असते. केवळ प्रेरित माणसेच स्वतःचे आणि सभोवतालच्या लोकांचे जीवन बदलू शकतात.
संपन्नता म्हणजे तुमचे कपडे, घर किंवा गाडी नव्हे. खरी संपन्नता म्हणजे तुम्ही किती हर्षभरित, प्रेमळ आणि परमानंदी आहात.
उद्या कधीच येत नाही. हीच तर जीवनाची सुंदरता आहे: तुम्हाला फक्त आजचा दिवस हाताळायला शिकायचे आहे. एका वेळी एकच दिवस, एका वेळी एकच क्षण.
एक बलवान राष्ट्र घडवण्यासाठी, आपण त्याला स्पष्ट दृष्टीकोन, वचनबद्धता आणि योग्य कृती करण्याचे धैर्य या गोष्टींनी जोपासले पाहिजे. भारताला या पृथ्वीवरील सर्वात चैतन्यशील राष्ट्र बनवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाच्या योगदानाची आवश्यकता आहे.
जीवन हे त्याच्या ध्येयात नाही. ते त्याच्या प्रक्रियेत आहे – तुम्ही या क्षणी स्वतःच्या आत त्याचा कसा अनुभव घेता, यातच जीवन आहे.
तुमची स्वप्ने सत्यात उतरू नयेत, तुमच्या आशा पूर्ण होऊ नयेत, कारण तुम्हाला जे माहित आहे त्यावरच ते आधारित आहेत. अशा शक्यतांचा शोध घ्या ज्यांना यापूर्वी कधीही स्पर्श केला गेला नाहीये.
जेव्हा तुम्ही तर्काचे गुलाम बनता, तेव्हा जीवनाच्या जादूला मुकता. लोकांना तर्काच्या चौकटी पलीकडे, त्यांच्या अस्तित्वाच्या खऱ्या जादूमध्ये घेऊन जाणे हेच माझे कार्य आहे.
जर तुम्ही उपस्थित असाल, तर मी नेहमीच उपस्थित असेन – तुमच्या संपूर्ण जीवनात आणि त्यानंतरही. मी देह सोडल्यानंतरही, उपस्थित असेन.
जेव्हा नवीन परिस्थिती निर्माण होते – अगदी तुम्हाला न आवडणारी असली तरीही – तिचा स्वीकार करा. तुमचा विरोध जितका कमी असेल, तितकेच तुम्ही अधिक चपळ आणि प्रभावी व्हाल.
जेव्हा तुम्ही आनंदी असता, तेव्हा तुमचा कोणाशीही संघर्ष नसतो, आणि तुम्ही सर्वात अद्भुत गोष्टी करता.