Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
एकदा तुम्ही स्वतःला भौतिक आणि मानसिक मर्यादांच्या पलीकडे अनुभवलं, तर भीती अशी काही उरत नाही.
तुमचं शरीर, तुमचा मेंदू आणि तुमची संपूर्ण प्रणाली तेव्हाच सर्वोत्तम कार्य करेल, जेव्हा तुम्ही आनंदी, उत्साही आणि धुंद असाल.
आपल्या शिक्षण पद्धतींनी माहितीच्या भडिमारापासून सत्याच्या शोधाकडे वळलं पाहिजे.
तुम्ही जर तुमच्या नश्वरतेबद्दल जागरूक आहात, तर आयुष्य संपूर्ण उत्साहाने जगाल.
विजयादशमी म्हणजे विजयाचा दिवस. जेव्हा तुम्ही - तम किंवा जडत्व, रज किंवा क्रियाशीलता आणि सत्व किंवा पार जाणे - या तीन मूलभूत गुणांवर मात करता, तेव्हा तुम्ही मुक्त होता.
जेव्हा पुरुष तत्व आणि स्त्री तत्व आपल्या जीवनात समान भूमिका बजावतील, तेव्हाच आपल्या अस्तित्वाला सौंदर्य आणि उद्दिष्ट प्राप्त होईल.
खऱ्या अर्थानं करुणा काही देणं किंवा घेण्याबद्दल नाही. खऱ्या अर्थानं करुणा म्हणजे फक्त जे आवश्यक आहे ते करणं.
तुमच्या विचारात आणि भावनेत संतुलन आणण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे - एखाद्या गोष्टीबाबत तुमची अतूट बांधिलकी.
कृतज्ञता ही काही व्यक्त करण्याची गोष्ट नाही. तुमच्या जीवनात योगदान देणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल तुमच्या आत कृतज्ञता असेल, तर ते तुमच्या अस्तित्वालाच विलीन करेल.
तुमच्या कामाचं स्वरूप किंवा जीवनातली परिस्थिती काहीही असू देत, जर प्रत्येक क्षणी तुम्ही खेळकर आणि उत्साही राहू शकलात, तर त्याचा अर्थ तुम्ही मुक्त आहात.
योग हा आनंदाचे रसायन तयार करण्याचा मार्ग आहे. एकदा तुम्ही तुमच्या स्वभावानेच आनंदी झालात, की तुम्ही बाहेरच्या परिस्थितींना सहजपणे हाताळू शकता.