Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
भक्ती ही सर्वात गोड भावना आहे जी तुम्ही स्वतःच्या आत जोपासू शकता.
उत्साही जीवन जगणं तेव्हाच शक्य असतं, जेव्हा जीवनाच्या अनिश्चिततेवर तुम्ही नाचू शकता.
तुम्ही जर सध्या जे काही आहात त्यात समाधानी असाल, तर प्रयत्न केल्यावर तुम्ही काय होऊ शकता याची तुम्हाला जाणीव नाहीये.
एखादी अद्भुत व्यक्ती भेटेल अशी इच्छा बाळगू नका. तुम्ही स्वतःलाच ती अद्भुत व्यक्ती बनवा, ज्याची अपेक्षा तुम्ही इतरांकडून करता.
आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीतून, आपण निर्माण करत असलेल्या प्रत्येक विचारातून आणि भावनेतून आपण आपल्या भोवतालची परिस्थिती अधिक चांगली बनवू शकतो.
सद्गुण म्हणजे नैतिकतेचे पालन करणे नव्हे. सगळ्या जीवांसाठी समावेशक बनणं, हाच सर्वात मोठा सद्गुण आहे.
जर तुम्ही ‘मोठे आहात’ असा विचार केला, तर तुम्ही लहान ठरता. जर तुम्हाला जाणवलं की, तुम्ही ‘काहीच नाही’, तेव्हा तुम्ही विशाल होता. हेच माणूस असण्याचं सौंदर्य आहे.
आत्मज्ञान हळुवारपणे घडतं, एखादं फूल उमलल्याप्रमाणे.
योग हे एक तंत्रज्ञान आहे. जर तुम्ही ते वापरायला शिकलात तर ते काम करतं - मग तुमचं मूळ काहीही असो किंवा तुमचा कशावर विश्वास असो अथवा नसो.
जीवन हे जाणिवेबद्दल आहे - चिंता, आसक्ती किंवा संघर्षाबद्दल नाही. येणारे महिने मानवी अस्तित्वाला आनंदी जीवनाकडे नेणारी गहनता प्रदान करोत.