Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
आपल्याला पुनर्निर्मितीचं जीवन जगायचं नाही. आपल्याला स्वतःच्या जीवनाचं लेखन स्वतःच करायचं आहे.
प्रेमाला प्रतिसादाची गरज असते – अन्यथा, ते जास्त काळ टिकत नाही. भक्तीला कोणाच्याही मदतीची गरज नसते – तुम्ही स्वतःहून हे चालू ठेवू शकता.
साधनेची कल्पना कुठेतरी जाण्याची नाही. तर अशा अवस्थेत येण्याची आहे, जिथे तुम्ही सहजपणे इथेच उपस्थित राहू शकाल. जे इथे आहे, ते सर्वत्र आहे – जे इथे नाही, ते कुठेही नाही.
जेव्हा अंतरंगातील देवत्व व्यक्त होते, तेव्हा एका व्यक्तीचा जन्म जगाला बदलू शकतो. तुम्हाला त्या देवत्वाची प्रचिती येवो. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.
जर तुम्ही तुमच्यातील निर्मितीच्या स्रोतालाप्रकट होण्यास वाव दिला, तर तुमचं अस्तित्वहे केवळ आनंदीच असू शकतं.सर्व अमंगल गोष्टींविरुद्ध आनंद हे सर्वोत्तम कवच आहे.तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आनंदी करण्याचे समाधान तुम्हाला लाभो.खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद,
एकदा तुमचे प्रेम, आनंद आणि शांती इतरांवर अवलंबून राहिली की, तुम्ही या गुणांना कधीही स्वतःचे म्हणून अनुभवू शकणार नाही.
कसे बसायचे, कसे उभे राहायचे, कसा श्वास घ्यायचा, प्रत्येक गोष्ट कशी करायची, तुमचे हृदय कसे धडकले पाहिजे, तुमच्यातील जीवन कसे स्पंदित झाले पाहिजे - जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देता, तेव्हा तुम्ही योगात असता.
निश्चलतेमध्ये, वेळ अस्तित्वात नसते.
गुरूंसोबत असणे म्हणजे आरामदायक गोष्ट नसून, मर्यादा तोडण्याचे एक सतत चालू असलेले साहस आहे.
तुम्ही चाला, नाचा, काम करा, खेळा, स्वयंपाक करा किंवा गाणे गा – ते संपूर्ण जागरूकतेने किंवा संपूर्ण त्यागाने करा. दोन्ही प्रकारे, तुम्ही निर्मितीशी एकरूप असता.
जेव्हा कोणताही जीव खऱ्या अर्थाने तळमळ दाखवतो, तेव्हा अस्तित्व प्रतिसाद देतं.