आपली बुद्धी आणि मन जेव्हा आपण खुश आणि आनंदी असतो तेव्हा उत्तमरित्या काम करते. मग आपण आनंदाने, खुश होऊन काम का नाही करत. आपण नेहमी ऐकतो, सांगतो आणि अमलात आणतो की कठोर मेहनत करूनच आपल्याला सगळं मिळवता येईल. सद्गुरू आपल्याला कठोर मेहनतीची कल्पना बाजूला सारून आनंदी आणि खुश राहून कसं पाहिजे ते मिळवता येते हे सांगत आहेत.

#SadhguruMarathi

आयुष्यात तुमची काही लक्ष्ये असतील, तर त्यांची किंमतही चुकवावी लागते, वेदना, कठीण परिश्रम, चिवटपणा. हा आपली वाट लावण्याचा राजमार्ग आहे. तुम्ही आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करता, कारण तुम्ही सर्वकाही 'हार्ड ' करता. एकदा का तुमची बुद्धिमत्ता तुमच्याच विरोधात उभी ठाकली, कि मग विश्वातली कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवू शकणार नाही.मुलाखतकार १: मला वाटतं वेदनेतूनच सफलता येते, आणि आयुष्यात तुमची काही लक्ष्ये असतील, तर त्यांची किंमतही चुकवावी लागते, वेदना, कठीण परिश्रम, चिवटपणा. आणि जर ..जर हे असंच आहे, तर लोक स्ट्रेस-ताण वगैरेपासून दूर का पळतात? कारण मी, एका... एका व्यक्तिगत पातळीवर, मी जिवंत आहे तोवर मला शिखरे सर करायची आहेत, आणि ती खूप ताण आणि वेदनांती च मिळणार. त्यानंतरच मी विश्रांती घेईन, कारण माझा थडग्याबाहेरचा काळ हा खूप मर्यादित आहे थडग्यामधल्या काळापेक्षा. तुम्हाला काय वाटतं, हि योग्य विचारधारा आहे का? सदगुरु: नाही. हा आपली वाट लावण्याचा राजमार्ग आहे.हि एक... हि एक फार मोठी चूक अनेक पिढ्या करत आल्या आहेत.. कि तुम्ही अभ्यास कसा करायला हवा? - 'हार्ड ' करायला हवा. तुम्ही परिश्रम कसे करायला हवेत ? - 'कठीण ' परिश्रम. तुम्हाला असं का नाही शिकवलं गेलं , कि अभ्यास आनंदोल्हासाने करावा असं का शिकवलं गेलं नाही कि परिश्रमही आनंदोल्हासाने करावा . नाही, तुम्ही सगळंकाही 'हार्ड ' करा. आणि मग तुम्ही तक्रार करता ... आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करत राहता कारण सर्वकाही 'हार्ड'च होऊन बसतं. विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात पुराव्यानी दाखवता येतं कि फक्त जेव्हा तुम्ही आनंदोल्हासीत अवस्थेत असता तेव्हाच तुमची बुद्धी आणि शरीर सर्वोत्कृष्ठ काम करते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट उत्कृष्ठ करणं , तुमची बुद्धी आणि शरीर सर्वोत्कृष्ठ अवस्थेत असणं तुम्हालेखी महत्वाचं नाहीये का? हॅलो? प्रेक्षक: येस सदगुरु: महत्वाचं आहे ना? प्रेक्षक: येस सदगुरु: मला सांगा, तुम्ही जर तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त असाल, तुमचा शरीर आणि बुद्धी उत्कृष्ठ काम करेल का? प्रेक्षक: नाही मुलाखतकार १: आपल्या शरीराला त्याची सवय होऊन जाते आणि त्यातूनच, जसं जिम मध्ये स्नायूंना खूप ताण दिल्यावर ते दुखावतात पण नंतर बिल्ड होतात. त्याचप्रमाणे आपण याही गोष्टींची सवयच करून घेऊ शकतो. सदगुरु: तसं नाही, जरी तुम्ही आनंदानं पळालात, पर्वत चढलात, खेळ खेळलात, तरी स्नायू बिल्ड होतील. हॅलो? मुलाखतकार (बिलाल): मग तणावाखाली तर अजूनच चांगले होतील. दुखावतील आणि जास्त चांगले बिल्ड होतील. सदगुरु: ना ना ना ना .... असं पहा, तणाव म्हणजे, आजकाल नवनवे फॅन्सी शब्द यासाठी शोधले जाताहेत. कुणी म्हणतं स्ट्रेस , कुणी टेन्शन, कुणी तणाव आणि असेच इतर.. ऑल राईट? अशी अनेकानेक नावे आहेत. असे काही बावीस - चोवीस वेगवेगळ्या मानसिक आजार आहेत जे आजवर शोधले गेले आहेत, फॅन्सी-फॅन्सी नावे. पण तत्वतः पाहता फक्त तुमची बुद्धिमत्ता तुमच्या विरोधात गेलेली आहे.एकदा का तुमची बुद्धिमत्ता तुमच्याच विरोधात उभी ठाकली, कि मग विश्वातली कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवू शकणार नाही. दॅट्स ऑल. जर तुमची बुद्धिमत्ता तुमच्या बाजूने काम करत असती , तर तुम्ही ह्याला सुखी ठेवला असतं कि तणावग्रस्त, सांगा मला. विचार करून बोला , मी आता 'तथास्तु' म्हणणार आहे . जर तुमची बुद्धिमत्ता तुमच्याबाजूने काम करत असेल तर तुम्ही स्वतःसाठी काय निवडाल? सुखसमाधान कि तणावग्रस्तता? प्रेक्षक: सुखसमाधान सदगुरु: तुम्ही शेजाऱ्यासाठी यातलं काय निवडाल हा वेगळा विषय आहे.. माहितीये ना आपण एकमेकांचे शेजारी आहोत मुलाखतकार (बिलाल): ओके