दिपावलीपर्वाचे निमित्त साधुन सद्गुरू आपल्यासाठी एक संदेश आणि आपले जीवन उजळून टाकील अशी एक खास भेट देत आहेत! आपली भेट येथे मिळवा : https://InnerEngineering.com/diwali मोफत नोंदणी फक्त 28 ऑक्टोबर पर्यंत.
सद्गुरु: नमस्कार, आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा! दिवाळी – दिव्यांचा उत्सव – तर, आपल्याला आपल्याभोवती नक्कीच प्रकाशाची गरज आहे, कारण आपले डोळे हे एक असं यंत्र आहे, की प्रकाशाशिवाय आपण असहाय्य आहोत. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रकाश तुमच्या आतून उभरून येतो. प्रकाश मुख्यतः द्योतक आहे. स्पष्टता नसेल, जर तुम्ही गोष्टी स्पष्टपणे पाहू शकत नसाल – केवळ डोळ्यांनी नव्हे, तर शक्य त्या प्रत्येक मार्गाने – तुम्ही जर जीवनाचे आकलन डोळे उघडे ठेऊन करत नाही आहात, तर प्रत्येक सोपी परिस्थिती एक अडचण बनते. केवळ स्पष्टता येताच तुम्ही मुक्त होता; परीपूर्ण स्पष्टतेने तुम्ही पूर्णतः मुक्त होता. हाच तर दिवाळीचा भावार्थ आहे. या दिवाळीत, आपण स्वतःलाच एक वचन देऊ की आपण आपल्या स्वतःमध्ये स्पष्टता आणि प्रकाश आणू. आपल्या स्वतःमधे स्पष्टता आणण्यासाठी, मी या दिवाळीत तुम्हाला एक भेट देत आहे. तुम्ही जर दिवाळीच्या दिवशी नोंदणी केली– किंवा मी तुम्हाला तीन दिवस देतो - दिवाळीच्या आधी एक दिवस, दिवाळीचा दिवस आणि पुढचा दिवस. या तीन दिवसात जर तुम्ही इनर इंजिनिअरींग ऑनलाइन कोर्ससाठी नोंदणी केलीत, तर ती तुम्हाला पूर्णपणे मोफत दिली जाईल. सामान्यातः परदेशात या कोर्सची किंमत अंदाचे एकशे पन्नास डॉलर्स येवढी आहे, पण दिवाळीच्या निमित्ताने मी तुम्हाला निशुल्क देतो आहे. पण तुम्ही या तीन दिवसांमधेच नोंदणी करणे आवश्यक आहे. आंतरिक स्पष्टता आणण्यासाठी जो कोणी ह्या तीन दिवसांत नोंदणी करेल, त्यांना आम्ही इनर इंजिनिअरींग ऑनलाइन कोर्ससाठी निशुल्क प्रवेश देऊ. बाह्य जगात स्पष्टता आणण्यासाठी एवढं करा, ह्या दिवाळीपासून – पण मला वाटतं तुम्हाला तोपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही – पण किमान या दिवाळीपासून, तुमच्या भोवती प्रकाश पसरवण्यासाठी रस्त्यावरच्या किमान तीन अनोळखी व्यक्तींकडे पाहून तुम्ही स्मितहास्य करावं, अगदी सहज दिलखुलास हास्य. कृपा करून हे करा आणि तुमच्या भोवतालच्या जगात सुद्धा थोडा प्रकाश चमकू द्या. चला आपण असे घडवून आणूया! तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा!