जेव्हा आपण कृष्ण अस म्हणतो, तेव्हा कृष्णाचं सार म्हणजे, तो एक अवखळ मुल आहे, एक प्रचंड खॊडकर, एक मोहक बासरी वादक, एक डौलदार नर्तक, अत्यंत मोहक प्रियकर, एक खराखुरा शुर योद्धा, आपल्या शत्रूंवर निर्दयीपणॆ विजय मिळवणारा, एक माणुस ज्याने प्रत्येक घरातील एक ऱ्हद्य भग्न केलय, एक चाणाक्ष राजकारणी आणी किंगमेकर, एक उत्तम सदगृहस्थ, एक सर्वात उच्चकोटीचा योगी, आणी सर्वात बहुरंगी अवतार. राधा, श्रीकृष्णाची बालसखी, एक गोपिका, खॆड्यातील एक सामान्य स्त्री, पण तिच्या निस्वार्थ प्रेम आणी श्रद्धेमुळे, ती इतकी मोठी बनलीय की आज तुम्ही राधेच नाव घेतल्याशिवाय कृष्णाबद्दल बोलूच शकत नाही. आपण कृष्ण राधा म्हणत नाही. आपण राधा-कृष्ण म्हणतो. ती बनली, एक खॆड्यातील सामान्य स्त्री, ती कृष्णा इतकीच किंवा त्याच्यापेक्षाही महत्वाची बनलीय. ती म्हणाली, ’कृष्ण नेहमी माझ्या सोबत असतो. कृष्ण जिथे ही आहे तो माझ्या सोबतच असतो. ’तो कुणासोबत ही असो, तरीही तो माझ्य़ा सोबत असतो.’ अशी तिची समजुत आहे.