भारत हे एकमेव असं स्थान आहे, जिथं आपल्या देवांना नाचता येणं आवश्यक आहे. ज्याला नाचता येत नाही तो देव असूच शकत नाही. शिवाला आपण नटराज म्हणतो, तो नर्तकांचा राजा आहे, आणि बाकी सर्वजण नर्तक आहेत. हे असं का आहे याचं कारण, सृष्टीचा जो प्रचंड चमत्कार आहे, त्याच्या अगदी जवळ जाऊन उदाहरण द्यायचं झालं तर ते एका नृत्याप्रमाणे आहे. आज आधुनिक शास्त्रज्ञ असे शब्द वापरू लागले आहेत की सृष्टीतील सर्व गोष्टी एक नृत्याप्रमाणे आहेत.