जर एखादे मंदिर महिलांना त्या महिला असल्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यापासून थांबवत असेल, तर ते थांबायलाच हवे – त्याबद्दल प्रश्नच नाही. पण तसे जर कोणत्या संवेदनशीलतेमुळे घडत असेल, ती देवता काही विशिष्ट स्वरूपाची असेल, तर त्याला लिंगभेद म्हणता येणार नाही. काही वेगळ्या कारणांसाठी या गोष्टी निर्माण केल्या गेल्या आहेत.