मी नुकताच कोयंबतूर मधील एका कुटुंबाच्या घरी आलो हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे की एखादी व्यक्ती तुमच्या घरी आली तर सर्व प्रथम पाण्याचा पेला हातात देऊन त्यांचं स्वागत केमं जातं नेहेमीच तर त्या स्त्रीने एका ट्रेमध्ये पाण्याचा पेला आणला, मी तिच्याकडे पाहिलं आणि तिने माझ्याकडे कालीप्रमाणे नजर टाकली तुम्ही सर्वांनी कालीविषयी ऐकलं आहे का? इतर देशातील व्यक्तींनी कालीविषयी ऐकलं आहे का? काली हे देवीचे जीभ बाहेर काढलेले एक भीषण रूप आहे सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला आहे वगैरे तर मी म्हटलं की तुम्ही आज कालीप्रमाणे दिसता आहात. मला हे पाणी प्यायचं नाही... मला पाणी प्यायचं नाही असे तुम्ही ज्या क्षणी म्हणता तुम्ही जर दक्षिण भारतातील कुणाच्या घरी जाणार असाल तर ही आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे की त्यांनी जर पाणी आणलं तर तुम्ही त्याला नाही म्हणत नाही, तुम्ही एक घोट तरी घेताच कळतं का? तुम्ही जर नाही म्हणालात, त्यांच्या घरात तुम्ही पाणी देखील प्यायला नकार दिलात याचा त्यांना प्रचंड मोठा अपमान झाल्यासारखं वाटेल, म्हणून आता आणखी एका प्रकारचे नाटक सुरू होईल याची मला जाणीव होती मग मी म्हणालो, ठीक आहे, आधी तुम्ही पाण्याचा घोट घ्या तिने पाण्याचा घोट घेतला आणि म्हणाली, पाणी चांगलं आहे म्हणजे मी तिचा वापर अन्नाची चव चाखणारी म्हणून करून घेतो आहे आणि ती म्हणाली की हे पाणी चांगलं आहे, म्हणजे तिला असं म्हणायचं होतं की मी त्यात विष घातलेलं नाही मी म्हणालो तू त्यामध्ये विष घालायला हवं असं नाही, तू जशी आहेस तेवढंच पुरेसं आहे. एक क्षणभर ते माझ्याकडे दे तिने ते पाणी माझ्या हातात दिलं. मी ते फक्त एक मिनिट माझ्या हातात धरून ठेवलं आणि पुन्हा तिला ते परत दिलं मी म्हणालो तू हे पाणी पी तिने ते पाणी पिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले आणि तिने मोठ्यांनं रडायला सुरुवात केली पाणी गोड आहे. फार गोड आहे. ती रडत होती. मी म्हणालो हे एवढंच आहे तुमचे संपूर्ण जीवन हेच आहे तुम्ही ते गोड बनवू शकता किंवा त्यात विष कालवू शकता. ते तुमच्यावरच अवलंबून आहे एवढंच त्याचं सार आहे तर आजचं पाणी भारतात आपल्याला अनेक प्रकारांनी याविषयी माहिती आहे, तीर्थ प्रत्येक मंदिरात तीर्थ असतेच कारण पाण्याला स्वतःची स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता असते आज याविषयी खूप काही वैज्ञानिक संशोधन केलं गेलं आहे पाण्याचा प्रत्येक अणू पाण्याचे रेणू एकत्र येऊन पाण्याचे बिंदु बनतात आणि त्यांच्यात अतिशय प्रचंड प्रमाणात पाण्याभोवती घडणारी प्रत्येक गोष्ट स्मृतीत ठेवण्याची क्षमता त्यात असते त्याच्या संपर्कात येणारी प्रत्येक गोष्ट ते आठवतं ते जीवंत आहे ते जीवंत आहे आणि ते बुद्धिमान आहे. मानवाची मज्जातंतूसंस्था ज्याप्रमाणे कार्य करते अगदी तसेच ते ही कार्य करते जर तुम्ही तुम्ही जर हे पाणी घेतलंत आणि त्याकडे फक्त पाहिलंत एक विशिष्ट भाव धारण करून, तर त्यामधील रेणूंची रचना बदलुन जाईल तुम्ही आणखी एका वेगळ्या भावनेने त्याकडे पाहिलंत, तर त्यातील रेणूंच्या रचनेत होणारे बदल वेगळ्या स्वरूपाचे असतील ही काही ज्येष्ठ, वयोवृद्ध लोकांची चर्चा नाहीये. अगदी आज सुद्धा तुम्ही पारंपरिक दक्षिण भारतीय घरांमध्ये जाऊन पहाल तर तुम्हाला पाणी एखाद्या देवाच्या मूर्तीप्रमाणे ठेवलेले दिसेल लक्षात घ्या विभूतीमुळे, त्यावर पवित्र अंगारा टाकून आणि योग्य प्रकारे त्याची पुजा करून, तुम्ही पिण्याअगोदर त्याची पुजा केली जाते पाण्याला स्मृती असते याची जाणीव आपल्याला नेहेमीच होती आणि त्याच्याकडे अचूक गोष्टींची स्मृती असेल तर ते तुमच्यामध्ये अचूक गोष्टीच करेल आणि त्यात चुकीच्या गोष्टींच्या स्मृती असतील तर ते तुमच्यात चुकीच्या गोष्टी करेल.