भारतातील गंभीरित्या आणि धोकादायक स्थितीत सुकत, लुप्त होत चाललेल्या आपल्या जीवनदायिनी नद्यांचे रक्षण, पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्यासाठी सद्गुरुंनी नदी अभियान अर्थात रॅली फॉर रिव्हर्स ही देशव्यापी मोहीम हाती घेतली. महाराष्ट्र हे यवतमाळ जिल्ह्यातील वाघारी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ईशा फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार करणारे पहिले राज्य आहे. महाराष्ट्र सरकारने यवतमाळ या पाण्याच्या तुटवड्याची गंभीर समस्या असणाऱ्या आणि अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या जिल्ह्यात नदी अभियानाचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यासाठी 415 कोटी रुपये मंजूर केले. जवळजवळ 100 “नदी वीर” म्हणजेच ईशाच्या नदी अभियानाचे पूर्णवेळ स्वयंसेवक, यवतमाळमधील प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला सहाय्य करण्यासाठी हजर आहेत. नद्यांबद्दल सर्वात मुलभुत अज्ञान आहे, लोकांना वाटत की नदी पाण्याचा स्रोत आहे, किंवा एक विहिर पाण्याचा स्रोत आहे किंवा एक ओढा, किंवा एक तळं पाण्याचा एक स्रोत आहे. एका उष्णकटीबंधीय देशात, ते पाण्याचा स्त्रोत नाहियेत, ती फक्त पाणी साठविण्याची ठिकाणं आहेत. आपल्यासाठी पाण्य़ाचा एकुलता एकच स्त्रोत आहे, तो आहे पावसाच पाणी. ते एकच ठिकाण आहे जिथुन आपल्याला पाणी मिळतय. तर पाऊस खाली पडतो, जो साधारणत: या देशात हो्तो, वर्षातील जास्तीत जास्त ४५ ते ६० दिवस. पाण्याचा आपल्यावर वर्षाव होतो, प्रचंड प्रमाणात पाणी पृथ्वीवर पडते.