सद्गुरू गणेश चतुर्थीच्या प्रतीकात्मक महत्वाचा वेध घेत, याचं बुद्धिमत्तेशी असलेल्या नात्याबद्दल बोलतात. ऑगस्ट आणी सप्टेंबर माहिन्यात भारतामध्ये एक सण साजरा केला जातो. त्याला गणॆश चतुर्थी म्हणतात. हा हत्तीचं तॊंड असलेला देव आहे. तो एक हत्ती नव्हता, तो एक गण होता. कुठेतरी एका कलाकाराने एक चुक केली, आणी तो हत्ती बनला. त्याला गणपती अस म्हणतात, याचा अर्थ , प्रमुख….गणांचा प्रमुख. तर, ते एक.. गणॆशाच एक रुप बनवतात मातीचं, न भाजता, आणी ते त्याला सुंदर रंगवतात, काही लोक रंगवल्याशीवाय ठेवतात, काही लोक रंगवतात. आणी मग ते त्याची पुजा करतात आणी एक मोठा सण, संगीत उत्सव त्याच्या अवती भोवती साजरा होतो, मोठा उत्सव- काही लोक खुप मोठा बनवतात, १०८ फुट उंचीचा, खुप मोठा. पण तो काळ संपल्यानंतर, साधारणत: एक आठवडा, पंधरा दिवस, वेगवेगळ्या जागी वेगवेगळा काळ, मग ते, जाऊन त्याला तलावात कींवा समुद्रात बुडवतात, देव पाण्यात विरघळुन जातो. एक देव निर्माण करा, त्याच्या भोवती उत्सव साजरा करा, त्याला तुमचं पुर्ण आयुष्य बनवा. ते पंधरा दिवस किंवा एक महिन्यासाठी गणेशाला सोडून दुसरं काहीच नसतं. तो जे खातो, अम्ही ते खातो, आम्ही ते पसंत करतो, जे त्याला पसंत आहे, सर्वकाही त्याच्याबद्दल असतं. पण एक दिवस आपण त्याचं विसर्जन करतो. आणी एकदा का वसर्जन झालं, की संपलं. ही एकमेव संस्कृती आहे, जिला अजुनही जाणीव आहे की देव, आपली निर्मिती आहे.