दत्तात्रेयाने परशुरामाला आपला शिष्य कसे बनवले?
मच्छिन्द्रनाथ आणि दत्तात्रेय हे योगपरंपरेत सर्वात महान योगी मानले जातात. सर्वांमध्ये.... अगणित आत्मज्ञानींमध्ये, त्या सर्वांत, ह्या दोघांना महान समजलं जातं. मच्छिन्द्रनाथ - कारण ते जसे होते, लोकांनी त्यांना प्रत्यक्ष शिवाचा अवतार मानलं. दत्तात्रेयाच्या बाबतीत त्यांच्या भोवतालचे लोक म्हणत कि ते ब्रह्मा, विष्णू महेशाचा एकत्र अवतार आहेत.
ही लोकांची व्यक्त करण्याची पद्धत आहे.
जेंव्हा त्यांनी एखाद्या मनुष्यात काही असं पाहिलं, जरी तो मनुष्य रुपात असला, पण मानवी असं काहीच
नाही, ह्याचा अर्थ असा नाही कि तो अमानुष आहे, पण तो नक्कीच फक्त साधारण मनुष्य नाही.
म्हणजेच त्यांनी असे गुण पहिले ज्याची तुलना ते फक्त ब्रह्मा, विष्णू महेश यांच्याशी करू लागले,
ते असं म्हणाले कि तो या तिघांचाही अवतार आहे.
म्हणून, दत्तात्रेयाच्या चित्रात तुम्हाला कधीकधी तीन डोकी दिसतील, कारण तो या तिघांचाही अवतार
आहे.
दत्तात्रेय एक अत्यंत रहस्यमयी जीवन जगले.
आजही, त्यांचा वंश, जे त्यांच्यापासूनच सुरु झाले, ते विशिष्ठ गोष्टी अनुसरतात, एक शक्तिशाली वंश!
तुम्ही कदाचित .... नक्कीच तुम्ही कानफट्यांबद्दल ऐकलं असेल?
हे दत्तभक्त आहेत.
आजही, ते सोबत काळी कुत्री घेऊन फिरतात.
दत्तात्रेयाच्या आजूबाजूला नेहमी काळी कुत्री असत. पूर्णपणे काळी.
मला या कुत्र्यांच्या विषयात जायचं नाहीये. पण त्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे.
त्यांनी कुत्र्यांचा विशिष्ठ प्रकारे उपयोग करून घेतला.
तुम्ही पाहिले असेल, कि तुमच्या घरी जर कुत्रा असेल तर त्याची आकलनशक्ती तुमच्याहून जरा अधिक
असते. हो ना?
वास, ऐकणे, नजर- तुमच्यापेक्षा तो जरा सरस असतो. .
तर, दत्तात्रेयांनी कुत्र्यांना एका वेगळ्याच पातळीवर नेलं, आणि त्यांनी नेहमी तीच कुत्री निवडली जी
अगदी काळी भोर असत.
आजही, कानफट साधू अशी कुत्री सोबत बाळगतात.
ते त्या कुत्र्यांना चालू देत नाहीत, ते त्यांना खांद्यावर घेऊन चालतात- तीही मोठी कुत्री, कारण ती
दत्तात्रेयाची आवडीची होती.
म्हणून ते त्यांना मानाने वागवतात.
दोनशे पिढ्या उलटूनही... त्यानी घालून दिलेला मार्ग अजूनही पाळला जातो आहे.
आजही, ती अध्यात्म साधकांचा तो सगळ्यात मोठा समुदाय आहे.
जेंव्हा परशुराम, म्हणजे एक परशु चालवणारा,
जो कुणी दिसेल त्यावर तो आपली कुऱ्हाड चालवत असे, स्वतःच्या आईवरही
अत्यंत अस्थिर भावनांचा मनुष्य ...