साधारणतः हठ योगी... कट्टर हठ योगी, ज्यांनी मुक्तीसाठी हठ योगाची वाट पकडलेली असते, ते केवळ एकाच आसनाचा, फक्त एका आसनाचा अभ्यास करतात. आता, एखादी व्यक्ती केवळ एका विशिष्ट पद्धतीने बसण्याचा प्रयत्न करण्यात संपूर्ण आयुष्य का वाया घालवते हे एखाद्या विचारी मनाला जाणून घेणं अशक्य आहे. परंतु, तुम्ही जर योग्य प्रकारे बसायला शिकलात, तुम्ही जर तुमचं शरीर योग्य प्रकारे धारण करायला शिकलात, तर ह्या विश्वातील जे-जे समजून घेणं गरजेचं आहे ते-ते तुम्ही जाणून घेऊ शकता. ह्यालाच ‘आसन सिद्धी’ म्हणतात.