नविन अपडेटस् साठी, या लिंकवर क्लिक करुन सबस्क्राईब करा - https://bit.ly/2NbeZ98
सद्गुरु आपल्याला दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी ३ कौशल्ये देत आहेत.
तुमच्या ऊर्जा तुम्ही सुजाणपणे वापरायला हव्यात. तुम्ही तुमच्या आतच स्वतःचे व्यक्तिगत सामर्थ्य विकसित कराल तुम्ही एका सम्राटासारखे चालाल! कारण तुमच्यामधील ती शक्ती तुमची चालच तशी बनवेल सद्गुरु : या आयुष्यात मनुष्य कुठवर प्रगती करू शकतो- भौतिकदृष्ट्या, अध्यात्मात, वा कुठल्याही इतर क्षेत्रात, हे तत्वतः अवलंबून असतं ते तो किती ऊर्जेने सळसळता राहू शकतो यावर. खरंय! असे कित्येक लोक आहेत ऊर्जेने भरलेले, पण सूज्ञता नाही, किंवा त्यांच्यामध्ये अश्या आवश्यक यंत्रणा नाहीत ज्याआधारे ते या ऊर्जेचे रूपांतर एक प्रकारच्या व्यक्तिगत शक्तीत करू शकतील. शक्ती हि गोष्ट इतरांशी संबंधित नाही, शक्ती ही तुमच्याशी निगडित आहे. तुमचे संभाव्य शक्तिसामर्थ्य किती आहे यावरून तुमच्या जीवनाची समरसता आणि प्रगल्भता ठरेल, आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात किती प्रभावी ठराल, जे काही कार्यक्षेत्र तुम्ही निवडले आहे त्यात. ही शक्ती जर तुमच्यात यायची असेल तर तुमच्या ऊर्जा तुम्ही सुजाणपणे वापरायला हव्यात. आवश्यक ती जाण आणि साधनांची जोड असेल तर उर्जा संघटीत करून ती शक्तीमध्ये रुपांतरीत केली जाऊ शकते. नाहीतर ऊर्जा सहजपणे वायाही घालवली जाऊ शकते, वायफळ अंतहीन विचार, प्रतिक्रिया आणि चिंतांमध्ये. तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्याचं नीट अवलोकन करायला हवं एक छोटीशी गोष्ट, फक्त... असं पहा..किती...एका दिवसात तुम्ही किती शब्द बोलता? कधी मोजलेत? ओह, एकदा मोजून बघा. मोजलच पाहिजे ! उद्या एक आडाखा बांधा, सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही किती शब्द बोलता याचा. परवा, ते पन्नास टक्क्यांनी कमी करा पण त्याच गोष्टी बोला. म्हणजे तुम्ही लोकांबरोबरच संभाषण थांबवत नाहीहात, तुम्ही अजूनही संभाषण करताहात, पण पन्नास टक्के शब्दांतून. तुमचं भाषेवरील प्रभुत्व तर नक्कीच वाढेल, आणि तुम्ही पाहाल, तुमचे व्यक्तिगत सामर्थ्य जबरदस्त वाढले आहे. आज वैज्ञानिक पुराव्यानिशी दाखवता येतं कि तुमच्या एकूण ऊर्जेपैकी वीस टक्के ऊर्जा, इथे निवांत बसल्या बसल्या तुमचा मेंदू खर्च करत आहे. हे प्रमाण जर तुम्ही कमी केलंत, मेंदूची ह्या वायफळ हालचाली, आणि सतत इकडून तिकडे भटकंती.. जर तो स्तब्ध, अचल राहून फक्त आवश्यक तेवढेच करू लागला, तर एक प्रचंड व्यक्तिगत सामर्थ्य वाढलेलं तुम्हाला जाणवेल. सध्या तुम्ही हे बुद्धीने साध्य करू शकत नाही. तुम्ही जर त्याला थांबवू पाहाल तर तो अधिकच वेडावून जाईल. पण कमीतकमी तुमच्या शरीराने तरी हे करा, तुमचे शब्द आणि तुमच्या शारीरिक हालचाली, पन्नास टक्क्यांनी कमी करा. तुम्हाला इकडे पाहावंसं वाटलं, तर पहा, तिकडे पाहावंसं वाटलं, तर पहा. पण असं असं असं करू नका. तुमच्या शरीरात आणि बोलण्यामध्ये हे तुम्ही केलं, कि ते हळूहळू तुमच्या मनातही झिरपेल. मन वायफळ विचार बंद करेल. जेव्हा तुम्ही अनावश्यक गोष्टी टाळता, तुमची ऊर्जा हळूहळू प्रचंड व्यक्तिगत शक्तीत रुपांतरीत करते. तर हे करण्यामध्ये, जी योगासने तुम्ही करता, जी सूर्यक्रिया तुम्ही करता, जर करत असाल तर... किंवा ज्या काही इतर क्रिया वगैरे तुम्ही करता, त्या मुख्यतः ही शक्ती विकसित करण्यासाठी आहेत. ती अनावश्यक गोष्टी करण्यात वाया घालवू नये. आता सध्या तुम्ही तुमच्या मनात येणारे अगणित विचार रोखू शकत नाही तेही होऊ शकतं .. जर तुम्ही स्वतःमध्ये एक स्पंदन निर्माण केलं, एक सोपा मंत्र...जर हे वेड्यासारखं धडपडत असेल, तर फक्त थोडावेळ मंत्रजप करा - एक स्पंदन निर्माण करा. तुम्ही पाहाल कि ते अपार शक्ती निर्माण करेल. ह्या आंतरिक शक्तीशिवाय तुम्ही आयुष्याच्या मिती भेदून, पार करू शकणार नाही. जीवन..सध्या, बहुतेक लोकांसाठी “दैवीं” म्हणजे पुराणातील वांगी! हा त्यांच्यासाठी सळसळता जिवंत अनुभव नाहीये. तो जर जिवंत अनुभव बनायचा असेल- जर सृष्टिकर्त्या इतकंच शक्तिशाली असंकाही अनूभवायचं असेल तर तुमच्यात अशी एक शक्ती असायला हवी. हे कायम लक्षात ठेवा, शक्ती म्हणजे वर्चस्व नव्हे! शक्ती म्हणजे अधिक परिणामकारक बनणे शक्ती म्हणजे अधिक सक्षम होणे. जेव्हा तुम्ही हे सामर्थ्याचा ठेवा अंतरी घेऊन चालता...तुम्ही या जीवनात सहज वाटचाल कराल - आणि मग, तुमचं समाजात स्थान काय आहे याची, तुमच्याकडे किती पैसा-अडका आहे याची तमा नाही, भौतिकदृष्ट्या काय आहात याची, एका चक्रवर्तीसारखे तुम्ही चालता. कारण तुमच्यामधील ती शक्ती तुमची चालच तशी बनवेल. 3 टिप्स :- पहिली युक्ती: शब्द पन्नास टक्क्यांनी कमी करा दुसरी युक्ती: हालचाल पन्नास टक्क्यांनी कमी करा तिसरी युक्ती: मंत्रजप करा