आधीच नोंदणी केली आहे?

तुमचे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा यांचा ताबा घेण्यासाठी आणि आनंदी, परिपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रभावी साधनं देणारा ऑनलाइन कार्यक्रम.

इनर इंजिनीयरिंग आता नवीन स्वरूपात!

नवीन काय आहे?

  • सद्गुरूंचे नवीन व्हिडियो

  • आणखी सखोल अनुभवासाठी अनेक दृश्य आणि संवादात्मक तत्वांचा समावेश

  • आता हा कार्यक्रम मोबाइल फोन वर देखील करता येईल. इनर इंजिनीयरिंगच्या साधनांचा तुमच्या दैनंदिन आयुष्यात समावेश करण्यासाठी नोटिफिकेशन आणि रिमाइंडरच्या सुवाधा.

या कार्यक्रमात इनर इंजिनीयरिंग ऑनलाइन कार्यक्रमाचे सर्व पैलू असून २१ मिनिटांच्या शांभवी महामुद्रा क्रियेच्या दिक्षाचा देखील समावेश आहे.

तुम्ही या पूर्वीच इनर इंजिनीयरिंग ऑनलाइन मध्ये नोंदणी केल्यामुळे:

  • तुम्हाला नवीन स्वरूपातल्या कार्यक्रमासाठी कमी शुल्कात नोंदणी करण्याची संधी आहे. कमी शुल्क पाहाण्यसाठी कृपया तुमचे तपशील खालील फॉर्ममध्ये भरा.

  • तुम्ही तुमचा इनर इंजीनीयरिंगचा प्रवास मागच्या वेळी जिथे सोडला होता, तिथपासून पुढे सुरू करू शकता. उदारणार्थ, जर तुम्ही पूर्वीच्या स्वरूपातल्या कार्यक्रमाच्या सत्र २ पूर्ण असेल, तर तुम्ही नवीन स्वरूपातल्या कार्यक्रमाच्या ३ ऱ्या चरणापासून सुरू करू शकता.

जर तुम्हाला यापूर्वी शांभवी महामुद्रा क्रियेमध्ये दीक्षा मिळाली असेल, तर तुम्ही या कार्यक्रमासाठी कमी शुल्कात पुन्हा नोंदणी करू शकता.

कार्यक्रमाचे स्वरूप

एकूण कालावधी: ~२५ तास
or
सर्व सत्रे ऑनलाइन घेतली जातात.

चरण १-६ स्वतःच्या सवडीनुसार करायचे आहेत

चरण १

जीवनाची यंत्रणा

“या धरतीवरचं सर्वांत प्रगत यंत्र म्हणजे मानवी शरीर. पण त्याचं यूझर्स मॅन्युअल सुद्धा तुम्ही वाचलेलं नाहये. या, आपण त्याकडे लक्ष देऊया.” - सद्गुरू

चरण २

एकमात्र बंधन

“तुमच्या इच्छेला बेलगाम होऊ द्या, तिला सीमित मर्यादांमध्ये बंदिस्त करू नका. इच्छेच्या अमर्यादतेमध्येच तुमचे परम स्वरूप दडलेले आहे.”- सद्गुरू

चरण ३

जगा, अगदी पूर्णपणे जगा

“तुम्ही जे आहात त्याचा अबाधित विस्तार केल्यानेच, जीवन तुम्हाला पूर्णपणे जगू देतं. जीवन पूर्णपणे किंवा पुरेपूर जगणं, हे एकमात्र समाधान तुमच्यातील जीवन जाणू शकतं.” - सद्गुरू

चरण ४

तुम्हाला वाटतं, ते तुम्ही नाही आहात

"तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण पूर्ण इच्छुक्तेतून जगण्याने तुम्ही प्रत्येक क्षणी स्वर्ग निर्माण करता. जे काही तुम्ही अनिच्छेने करता तो निश्चितच तुमचा नरक असतो." — सद्गुरू

चरण ५

मन : एक चमत्कार

“बहुतेक लोक त्यांच्या मनाला नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करत आहेत. माझी इच्छा आहे की तुम्ही तुमचं मन मुक्त करावं आणि त्याला त्याच्या संपूर्ण शक्यतेपर्यंत जाऊ द्यावं.” - सद्गुरू

चरण ६

तुम्हाला हवे ते निर्माण करा

"तुमचे आरोग्य आणि तुमचे आजार, तुमचा आनंद आणि तुमचं दुःख, सवर्काही आतूनच निर्माण होतं. जर तुम्हाला खरं स्वास्थ्य हवं असेल, तर वेळ आली आहे आत डोकावण्याची."—सद्गुरू

चरण 7 निवडक तारखांना लाइव्ह प्रदान केले जाईल

चरण ७

शांभवी महामुद्रा क्रियेची दीक्षा

“शांभवी महामुद्रा क्रिया ही सृष्टीच्या स्त्रोताला स्पर्श करण्याचे साधन आहे. तुमच्या सर्वात आतल्या गाभ्याला स्पर्श करण्यामध्येच, खरे रूपांतरण आहे.” - सद्गुरू

शांभवी महामुद्रा क्रियेबद्दल सद्गुरू

पुढे सुरू ठेवा

कार्यक्रम

Isha Logo
Loading...

Secure payment gateway is opening.
Do not refresh or press the back button.