प्रश्न: सदगुरू, आजकाल आपण पाहतो खुप सारे तरूण रिलेशनशीपमध्ये आहेत. तर पब्लिक डिसप्ले ऑफ एफेक्शन (PDA) (सार्वजनिकरित्या प्रेम व्यक्त करण) हे आजच्या तरूण पिढीमध्ये खुप सामान्य आणी लोकप्रिय आहे आणी दुसऱ्यांसमोर उघडपणॆ मित्रांना मिठी मारण किंवा जोडीदाराच चुंबन घेण ही आमच्यासाठी खुप साधारण गोष्ट आहे. पण आमच्या आधीच्या पिढीबद्दल बोलायचं झालं तर,त्यांना पीडीए म्हणजे काहीतरी अश्लील वाटत. तर हे खुप विचित्र आहे….की प्रेम कुणाला कसं खटकू शकतं. तर माझा प्रश्न आहे की कुणाच्या दृष्टीकोनाला तुम्ही पाठिंबा देता? तरूण पिढीच्या की तुमच्या स्वत:च्या पिढीच्या? सदगुरू: जर एक गांडूळ म्हणालं ”मी एका रिलेशनशीप मध्ये आहे” आणी ते ….. दोघं एकमेकांत गुंतून राहिले, तर मी समजू शकतो. जेव्हा एक माणूस म्हणतो , “मी एका रिलेशनशीप मध्ये आहे” तो एक मित्र असू शकतो, तो एक भाऊ असू शकतो, ती एक बहिण असू शकते, विविध प्रकारचे नातेसंबंध असू शकतात, आणि शरीरावर आधारितही. तर “रिलेशनशीप” या शब्दाला फक्त शाररीक गोष्टींशी जोडून बघणं , हे मुळात यामुळॆ आहे की नकळत , नकळत आपण इन्टरनेट द्वारे अमेरिकेचे गुलाम झालो आहोत. याची सुरूवात युनायटेड स्टेट्स मध्ये झाली. रिलेशनशीप चा अर्थ ते विरुद्ध लिंगाबद्दल किंवा काहीतरी लैंगिक असायला हवं. का? तुम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या रिलेशनशीप ठेवू शकत नाही? हॅलो? आपण त्यात सक्षम नाही? मी विचारतोय. आपण लोकांच्या शरीराला गोंजरल्याविना घनिष्ठ आणी सखॊल नातं ठेवू शकतो की नाही? मी म्हणतोय, शक्यये की नाही?