प्रश्न: नमस्कारम सद्गुरू, तुम्ही म्हटले आहे की लिंगभैरवि देवी मधे साडे तीन चक्र अधिष्ठापित आहेत - मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूरक आणि अर्धा अनाहत. तसेच, देवीच्या अनेक नावांपैकी 'त्रिनेत्रीनी' - अर्थात "तीन नेत्र असलेली" - हे नाव देखील आपण वापरतो. तिसर्‍या नेत्राचा संबंध आग्न्याचक्राशी आहे असे जर आपण म्हणतो, तर मग लिंगभैरवि देवी मधे आग्न्याचक्र देखील आहे का?

सद्गुरू: तिसर्‍या डोळ्याची आपल्या शरीरात, जशी तुम्हाला वाटते तशी, एक ठराविक जागा नाही. तुम्हाला इथे (चेहेर्यावर, कपळा खाली) दोन डोळे आहेत, म्हणून तुमची अशी समजूत झाली की तिसरा डोळा देखील त्या दोघांच्या साधारण मध्यात असेल. तसं नाहिये! आपले हे दोन डोळे फक्त तेच बघू शकतात जे प्रकाशाला अडवते. तुम्ही एखादी गोष्ट बघू शकता कारण ती प्रकाशाला अडवते आहे. समजा, एखादी गोष्ट अशी बनली की ज्यामधून प्रकाश आरपार जाऊ शकेल; ती वस्तू जर पूर्णत: पारदर्शक झाली, तर तुम्हाला ती दिसणार नाही.

देवीचा दर्शविलेला तिसरा डोळा हे केवळ एक प्रतीकचित्रण आहे. आग्ना चक्र ‘जाणून घेण्या’शि संबंधित असल्यामुळे, सामान्यत:, तिसरा डोळा इतर दोन डोळ्यांच्या मधोमध आहे असे दर्शवीले जाते.

तुम्ही तुमच्या भोवतालच्या गोष्टी बघू शकता कारण हवा पारदर्शक आहे. जर हवा प्रकाशाला रोखु लागली तर तुम्ही काहीच बघू शकणार नाही. तर, तुमच्या या दोन डोळ्यांनी तुम्ही त्याच गोष्टी बघू शकता ज्या भौतिक आहेत. आणि भौतिक आयामात देखील तुम्ही सगळ्याच भौतिक गोष्टी बघू शकत नाही. या दोन डोळ्यांनी तुम्ही भौतिकत जगातल्या केवळ स्थूल वस्तूच तेवढ्या बघू शकता; सूक्ष्म नाही. हवा जरी भौतिक स्वरूपाची असली तरी आपण तिला बघू शकत नाही कारण ती प्रकाशाला रोखत नाही. भौतिकतेच्या पलीकडील कुठलीही गोष्ट आपण या दोन डोळ्यांनी बघू शकत नाही.

जर कोणी अशा अवस्थेत गेला जिथे त्याला भौतिकतेच्या पलिकडले दिसू लागले, अनुभवात येऊ लागले किंवा त्याला त्याची जाणीव होऊ लागली, तर त्याचा 'तिसरा डोळा' उघडला असे आपण म्हणतो. देवीचा दर्शविलेला तिसरा डोळा हे केवळ एक प्रतीकचित्रण आहे. आग्ना चक्र ‘जाणून घेण्या’शि संबंधित असल्यामुळे, सामान्यत:, तिसरा डोळा इतर दोन डोळ्यांच्या मधोमध आहे असे दर्शवीले जाते. पण प्रत्यक्षात तो कोण्या एका निश्‍चित ठिकाणी नसतो.

समजा मी एखाद्या ठिकाणी गेलो आणि मला तिथे काही विशिष्ट प्रकारची उर्जा जाणवली, असं जाणवलं की तिथे काहीतरी घडतय; तर काय घडतय हे जाणून घेण्यासाठी मी सर्वप्रथम, माझे डोळे बंद करतो, बोटांना सक्रिय करतो आणि माझा डाव्या हाताचा तळवा खालच्या दिशेला ठेवून हात समोर करतो. तुम्हाला एखादी वस्तू गरम आहे की थंड हे जर माहीत नसेल, तर तुम्ही देखील आपला तळवा त्यावर थोड्या अंतरावर धरून बघाल की ती गरम आहे की थंड. याचा अर्थ तुमचा 'तिसरा डोळा' तुमच्या हाताच्या बोटात आहे का? एक प्रकारे, हो! त्या क्षणापुरते! पण तिसर्‍या डोळ्याला कुठलेही भौतिक स्थान नाही. ती कुठली शारीरिक क्रिया नाही. तो एक प्रकाचा बोध आहे, एक जाणून घेण्याची प्रक्रिया!

तर, देवीला 'तिसरे नेत्र' आहे का? हो, नक्कीच! तिच्यामधे साडेतीन चक्र आहेत का? होय!

जेव्हा आपण अश्या गोष्टींना जाणून घेण्या संदर्भात बोलतो ज्या भौतिक नाहीत, तेव्हा ह्या 'तिसर्‍या डोळ्याचे' स्थान आपल्या भौतिक शरीरात एखाद्या विशिष्ट ठिकाणीच प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू नका. जी गोष्ट भौतिक नाही तिला याच जागी किंवा त्याच जागी असण्याची कुठलीही सक्ती नाही. ती एकाचवेळी इथेही असु शकते आणि तिथेही. जेव्हा आपण अशा गोष्टींना उद्देशून बोलतो ज्या भौतिक नाहीत तेव्हा तुम्ही तिच्या भौतिक स्थाना विषयी विचार करायला नको. जेव्हा तुम्ही अशा आयामा वियीष बोलता जो भौतिक नाही, त्याला इथे आणि तिथे, लागू पडत नाही. जे भौतिक नाही त्याला अवकाश, भौतिक अंतर किंवा स्थान या गोष्टी लागू पडत नाहीत. केवळ भौतिकतेलाच अंतर आणि स्थान ह्या गोष्टी लागू असतात. जे भौतिक नाही त्याला कुठले विशिष्ट भौगोलिक स्थान नसते. तर, देवीला 'तिसरे नेत्र' आहे का? हो, नक्कीच! तिच्यामधे साडेतीन चक्र आहेत का? होय!