200 पेक्षा अधिक साधकांच्या सहभागाने ईशा योगा केंद्र येथे; गुरु पौर्णिमा २०१८ रोजी सुरू झालेला साधनापादाच्या पहिल्या कार्यक्रमाची सांगता 2019 च्या महाशिवरात्रीला झाली. यात सहभागी साधक प्रखर साधनेचे दैनंदिन वेळापत्रक सांभाळून 7 महिन्याच्या परिवर्तनशील कालावधीमध्ये ईशा योग केंद्रातच राहिले, ज्यामध्ये ध्यान-योग अभ्यास आणि स्वयंसेवा यांचा समावेश होता.

 

या महिन्यात, सहभागी व्यक्ती ज्या संधीची आतुरतेने वाट पाहत होते, ती संधी त्यांना मिळाली. सहभागी व्यक्तींना सद्गुरूंसोबत चर्चा करण्याची संधी मिळाली, आणि सदगुरुंच्या सान्निध्यात साधकांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले.

सद्गुरु: आपण सर्वांनी या साधनापादात अत्यंत सुरेख कामगिरी पार पाडली आहे. मला आपले खूप कौतुक
वाटते. आजच्या या काळात, जेंव्हा तरुण पिढी अशा सर्व गोष्टींमध्ये सहभागी झालेली मी पाहिली ज्या गोष्टींपासून विशेषता त्यांनी दूर असले पाहिजे, तेंव्हा तुमच्या वयाच्या अनेकांना या ठिकाणी पाहून खूपच छान वाटले. मी मोठा होत असताना, माझ्या आजूबाजूचा प्रत्येकजण अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत असत. मीच एक असा विचित्र होतो, ज्याला आपल्या आत काहीतरी करण्याची इच्छा होती. इतर प्रत्येकाला दुसर्‍या कोणाशीतरी काहीतरी करायचे होते. म्हणून तुम्हा सर्वांना येथे पाहून खूप छान वाटते आहे.

जर तुम्ही केवळ तुमची माणुसकी जागृत ठेवलीत, तर प्रत्येक क्षणी मी तुमच्यासोबत आहे – पण तुम्ही मात्र ती सदैव जागृत ठेवली  पाहिजे. इतर सर्व प्राणिमात्रांना त्यांच्या उपजत प्रवृत्तीनुसार जगणे भाग आहे. त्यांच्यापैकी प्रत्येकजण प्रत्येकक्षणी आपापल्या मार्गाने, त्यांच्या प्रवृत्तीनुसार त्यांच्या मर्यादा ठरवत आहेत. पण एक मनुष्य म्हणजे; मग ती स्त्री असो किंवा पुरुष, ते जागरूकपणे त्यांच्या मर्यादा पुसून टाकू शकतात – ते कुठल्याही मर्यादांशिवाय राहू शकतात. भौतिक कारणांसाठी आपण वावरत असलेले व्यवहारी जगाचे स्वरूप यामुळे,
आपण कदाचित काही सिमी निश्चित करू, पण आपल्या हृदयात मात्र कोणत्याही सीमा नाहीत.

म्हणून, तुमच्या स्वतःच्या आयुष्यात हे कसे घडवून आणता येईल, याकडे लक्ष द्या. साधनापादाचा कालावधी संपला आहे, याचा अर्थ असा नाही, की सारे काही संपले आहे. जीवन म्हणजे एक साधना आहे... साधना याचा अर्थ आहे साधन. हे शरीर, मन, आणि ऊर्जा ही आपली साधने आहेत आणि खरे म्हणजे केवळ हीच एकमेव साधने आपल्याजवळ आहेत. ती जर परिणामकारक आणि तीक्ष्ण बनली नाहीत, तर जीवन निरर्थक, निरस, निरुत्साही होईल. तुमच्याकडे कदाचित धन-दौलत, संपत्ती आणि इतर अनेक गोष्टी असू शकतील, पण आपले जीवन जर आपण संपूर्ण जोमाने जगू शकलो नाही, तर या सर्व गोष्टी उपद्रवी होतील यात शंका नाही. हाच साधनेच अर्थ आहे – की तुम्ही आपले शरीर, मन आणि उर्जा यांना एक शक्तीशाली साधन बनवा. म्हणून आपण या साधंनांचा वापर करणे शिकले पाहिजे. आपण जर या साधंनांचा वापर करायला शिकलात, तर सहजीकच तुम्ही तुमच्या मर्यादा मोडून टाकाल. आणि शक्तिशाली साधनांसोबत कोणत्याही मर्यादांचा अभाव,  तर मग तुम्ही या पृथ्वीवरची एक विलक्षण शक्ती बनाल. आपल्याला असेच घडलेले पहायचे आहे. या! आपण हे घडवून आणुयात.

साधनापादाचा हा पहिला कार्यक्रम समाप्त होत असताना, साधकांनी महाशिवरात्री आणि सम्यमाची तयारी करत असतानाच्या त्यांच्या कार्य-कृतींवर एक नजर टाकू.

sadhanapada-2019-collagepic

साधनापादातून कैवल्यपादात वाटचाल करताना, साधक गेल्या सात महिन्यांमध्ये त्यांनी केलेल्या तीव्र साधनेचा आढावा घेत एक आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वांगीण स्थैर्य अनुभवतात. प्रत्येकजण ईशा योगा केंद्रात साजर्‍या होणार्‍या महाशिवरात्री उत्सवाची आतुरतेने वाट पाहत, हा उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत.

संकेत, भारत – महाशिवरात्री नियोजन  टीममध्ये सहभागी होतो आहे

Intense activity and absolute stillness! It is my dream to experience these two aspects while in Sadhanapada. I am very happy to see myself moving in that direction especially in last few weeks during Mahashivratri volunteering. Getting to know the Classical Yoga Workshop participants, and understanding and supporting them has been a wonderful experience for me.

तीव्र क्रियाशीलता आणि संपूर्ण निश्चलता! साधनापादात असताना या दोन गोष्टी अनुभवणे हे माझे स्वप्न आहे. आणि विशेषतः गेल्या काही आठवड्यांमध्ये महाशिवरात्री उत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करत असताना, त्या दिशेने जातो आहे याचा मला अतिशय आनंद आहे. क्लासिकल योगा वर्कशॉपमध्ये सहभागी होणार्‍या साधकांची ओळख करून घेणे, आणि त्यांच्या गरजा ओळखून त्यांना मदत करणे हा माझ्यासाठी एक अतिशय चांगला अनुभव आहे.

स्टीव्हन, जर्मनी – मी साधनापाद कार्यक्रमात का सहभागी झालो?

इतर सर्वजण करत आहेत म्हणून मला हे करायचे नव्हते. ज्याने खरोखरच बदल घडून येईल असे काहीतरी करण्याची मला इच्छा होती.. आणि साधनापादद्वारे ते एक असे माध्यम उपलब्ध करून देत आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला अन्न, भोजन, किंवा इतर कोणत्याही गोष्टींची काळजी करावी लागत नाही. तुम्ही केवळ येथे सहभागी होऊन, स्वयंसेवा करून आनंदी आणि समाधानी राहू शकता.

अनिरुद्ध, रशिया – कृतज्ञतेचा अर्थ शिकतो आहे

दक्षिण भारत यात्रेसाठी रशियाहून आलेल्या लोकांना सोबत करणे हा माझ्या सेवेचा एक भाग होता. त्यांच्यासोबत ही यात्रा केल्यामुळे एक परिपूर्ण आनंदाची अनुभूती झाली, कारण मला अन्न, किंवा झोप याची काळजी करावी लागली नाही, आणि सतत त्यांचा अनुभव कशा प्रकारे अधिक समृद्ध करता येईल याबद्दलच विचार करत होतो.

मला ही संधी दिल्याबद्दल मी फार कृतज्ञ आहे. साधनापादाच्या अनुभवातून एक महत्वाची गोष्ट मी शिकलो आणि ती म्हणजे कृतज्ञतेच खरा अर्थ मला गवसला.

पॉलिना, मेक्सिको –  जुने सोडून जीवनाच्या नव्या उत्सवी आयामात प्रवेश

मी भारतीय संस्कृतीची येवढी मोठी चाहती आहे, की गेल्या जन्मी मी नक्कीच भारतीय होते अशी माझी खात्री आहे! एक देश म्हणून, या देशातील लोकं अनेक प्रकारे जीवनाचा उत्सव साजरा करतात – प्रत्येक ऋतुसाठी, आपल्या कामाच्या वस्तूंसाठी, प्रत्येक देवासाठी, प्रत्येक प्राण्यासाठी, प्रत्येक वनस्पतीसाठी, अगदी प्रत्येक गोष्टीसाठी!

माझ्यासाठी साधनापादाचा अर्थ मुक्ती असा आहे – जुन्या मार्गांपासून मुक्ती. यापूर्वी मी नेहेमीच तणावग्रस्त किंवा नैराश्यात किंवा रागात, किंवा अस्वस्थ असायचे - मी सदैव कोणत्या ना कोणत्यातरी गोष्टीसाठी अस्वस्थ असे. आणि साधनापादाने मला त्या नेहेमी अस्वस्थ असण्याच्या स्थितीमधून मुक्त केले आहे.

नोरा, जर्मनी / आयर्लंड: नैराश्येतून आनंदाकडे

मी वेगवेगळ्या देशात राहून वेगवेगळी कामे करत होते. त्यामुळे मला नेहेमी अस्वस्थपणा जाणवायचा. आणि येथे येण्यापूर्वी माझ्यावर कामाचा किती तणाव होता याची यापूर्वी मला कल्पना देखील नव्हती. माझ्यासाठी हे समजणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे.

म्हणून साधनापादाचे हे सात महीने माझ्यासाठी अतिशय उत्साहाचे होते आणि मला येथे येऊन माझ्यात आनंद आणि स्पष्टता आणि संतुलन प्रस्थापित करणे शक्य झाले आहे आणि ही माझ्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे.

२०१८ साधनापादाच्या साधकांसाठी पुढे काय?

यामधून प्रेरणा घेऊन, काहीजण आश्रमातच पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून काम पाहतील आणि सद्गुरूंना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करतील, तसेच साधनापादाच्या दरम्यान प्रस्थापित अनुभवांची व्याप्ती वाढवतील. इतर लोकांनी आश्रमातील कार्य-कृतींना ते जे कुठे असतील, तेथूनच पाठिंबा देण्याचे, किंवा पुन्हा येथे येऊन 2019 मधील साधनापाद कार्यक्रमासाठी सहकार्य करणाचे सूचित केले आहे.

साधनापाद 2019 साठी नोंदणी सुरू झाली आहे!

साधनापादाचा लाभ घेण्याची संधी अधिकाधिक व्यक्तींना मिळावी म्हणून या वर्षी सद्गुरु हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करणार आहेत. हा कार्यक्रम गुरु पौर्णिमेला (जुलै 2019) सुरू होऊन महाशिवरात्रीला (फेब्रुवारी 2020) संपेल.

अधिक महितीसाठी कृपया:+91-83000 98777 या क्रमांकावर संपर्क साधा.

Register Now