जोपर्यंत तुम्ही तुमच्यामधील स्वर्ग आणि नरक या कल्पनांचा नाश करत नाही, तोपर्यंत तुम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही हे सद्गुरु स्पष्ट करून सांगत आहेत. ते या प्रक्रियेची तुलना अंडं भेदून बाहेर उभरून येण्यासोबत करतात - जेंव्हा ते फुटते, तेंव्हा तुम्हाला त्यात पुन्हा आत जाता येत नाही पण एखादी संपूर्णतः अदभूत नवीन असं त्यातून बाहेर येते.

सद्गुरु: जा जगात प्रत्येक ठिकाणी, स्वर्ग आणि नरक या दोन स्थळांची विक्री केले गेली आहे ते केवळ मानवी समाजावर नियंत्रणात ठेवण्यासाठी. जेंव्हा व्यक्तिगत माणसांना किंवा लोकांच्या गटाला  कसे नियंत्रणात ठेवावे हे माहिती नव्हते, तेंव्हा त्यांनी ही युक्ती शोधून काढली. “मी जर आत्ता तुम्हाला शिक्षा देऊ शकत नसेन, तर मी नरकात मात्र तुम्हाला नक्कीच शिक्षा करेन. तुम्ही इथे दाखवत असलेल्या सर्व सत्कार्याचे बक्षीस तुम्हाला आपण इथे देत नाही आहोत, तर स्वर्गात मात्र नक्कीच मिळेल."

पण सत्य हे जर अस्तित्वाहून काही वेगळंच असेल, तर त्याचा शोध घेणे हे व्यर्थ आहे. आपण “असतोमा सद्गमय” असा मंत्रघोष करतो, त्याचा अर्थ असत्यापासून सत्याकडे पोचण्याचा प्रवास असा आहे. पण खरं पाहता हा प्रवास नाहीये. प्रवास या शब्दामुळे कदाचित असे वाटू शकते की आपल्याला काही अंतर पार करायचे आहे. असे कोणतेही अंतर पार करायचे नाहीये. जाणून घेणे हे फार दूर नाहीये, कारण तुम्हाला जे काही जाणून घ्यायचे आहे ते कुठल्या पर्वताच्या शिखरावर जाऊन बसलेले नाही, ते तुमच्या आतच आहे.

स्वर्ग आणि नरक आहेत तुमच्या आतच

योग नष्ट करत असलेली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वर्ग आणि नरक. जोपर्यंत स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना तुमच्यात रूढ आहेत, तोपर्यंत आंतरिक कल्याणाचे तंत्रज्ञान आणि मनुष्याची मुक्तीच्या दिशेने वाटचालीची प्रक्रिया अर्थहीन आहे कारण काही झाले तरी, मृत्यूनंतर जाण्यासाठी फक्त दोनच ठिकाणं आहेत – एक तर तुम्ही वाईट ठिकाणी जाता किंवा चांगल्या ठिकाणी. काही तरी करून जर तुम्ही चांगल्या जागी पोहोचण्याचे तिकीट मिळवलेत, तर मग तुम्ही इथे कसे जगता याची दखल तुम्हाला घ्यावी लागणार नाही. मानवता आजवर या प्रकारे वागण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे धर्मांचा आधार. आयुष्यात तुम्ही वाट्टेल ते केलंत तरी त्याने काहीच फरक पडत नाही, जर तुम्ही फक्त या दोन, चार गोष्टींवर विश्वास ठेवलात की बस्स, स्वर्गात तुमची जागा पक्की. 

तुमची ऊर्जा ज्या प्रकारे कार्यरत असते त्यानुसार संपूर्ण स्वर्ग किंवा नरक निर्मितीची साधने तुमच्या आतच उपलब्ध आहेत.

आज तुमच्यात कार्यरत असलेला स्वर्ग आणि नरक जर यांचा तुम्ही नाश केला नाही, तर खरोखर सत्याच्या दिशेने वाटचाल होणे शक्य नाही. सध्या, तुमचे स्वतःचे शरीर आणि मनच स्वर्ग किंवा नरक निर्माण करत असेल; या दोघांत या दोन्ही गोष्टी निर्माण करण्याची क्षमता आहे. तुम्ही कुठेही असलात तरी याने काहीच फरक पडत नाही, ते सतत स्वर्ग नाहीतर नरक निर्माण करण्यात गुंतलेले असतात.

तुमच्या मनाचे विवेकबुद्धीने वागण्याचे स्वरूप अशा प्रकारचे आहे की जेंव्हा तुम्ही नरक निर्माण करता, आणि जेव्हा ते खूपच यातनामय होते, तेंव्हा तुम्ही थोडीशी माघार घेता. जेंव्हा तुम्ही स्वर्ग निर्माण करता, आणि तेथे सर्व काही अतिशय सुखासीनता भासते, तेंव्हा तुमचे वास्तविकतेचे भान राहता नाही आणि मग वास्तविकताच तुम्हाला जमिनीवर आपटून टाकते – आणि मग पुन्हा तुम्ही थोडीशी माघार घेता. पण जेंव्हा तुम्ही शरीर त्यागता, तेंव्हा तुम्ही तुमची विवेकबुद्धी सुद्धा गमावुन बसता. मग, जे मन स्वर्ग निर्माण करत होते, ते स्वर्ग निर्माण करण्यातच व्यस्त राहते, लाखोपटींनी सुखासीन स्वर्ग. जे मन नरक निर्माण करत असते, ते नरकच निर्माण करण्यात गढून जाते, लाखोपटींनी वेदनादायी, कारण विवेकबुद्धी – जी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला, की आपल्या इच्छेनुसार माघार घेण्याची क्षमता आता अस्तीत्वात राहिलेली नसते.

तुमची अवघी ऊर्जा ज्या प्रकारे कार्यरत असते त्यानुसार संपूर्ण स्वर्ग किंवा नरक निर्माण करण्याची साधने तुमच्या आतच उपलब्ध आहेत. आणि ते नेहेमी याच कक्षेत कार्यरत असेल, पण ते स्वर्गरुपी विश्व किंवा नरकरुपी विश्व असू शकते. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यायचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला वाटू शकते, की “मला नरकाचा नाश करू दे, आणि स्वर्ग शाबूत ठेवू दे.” पण तसे कधीही घडणार नाही कारण ते दोन्ही आयाम निर्माण करण्याची साधने तीच आहेत. तेच कक्ष, तीच सामुग्री. काही जणांसाठी ते परमानंदाचे कक्ष असतात. तर काहींसाठी ते यातनांचे कक्ष असतात. आणि ते कोणत्याही क्षणी एकमधून दुसऱ्यात अदलाबदल करू शकतात. ते जणू एका दिव्याच्या बटणासारखे असते. तुमच्याकडे जर दोन प्रकारचे दिवे असते, एक पांढरा दिवा आणि एक निळा दिवा, तुम्ही जर निळा दिवा ऑन केला, तर त्याचा एक प्रकरचा अनुभव होतो. जर तुम्ही पांढरा दिवा सुरू केला, तर अचानकपणे ती जागा एकदम आगळीवेगळी वाटू लागते. पण जेंव्हा अंधार असतो, आणि तुम्ही दिवा लावण्यासाठी धडपडता, तेंव्हा पांढर्‍या दिव्याऐवजी तुम्ही निळा दिवा लावू शकता, निळ्या दिव्याऐवजी तुम्ही पांढरा दिवा लावू शकता. हे असे नेहेमीच घडेल.

विझवूयात दिवे!

कोणतीही व्यक्ती फक्त नरकाचा नाश करून स्वर्ग शाबूत ठेवू शकणार नाही. पण तुम्ही निरंतर आनंदी राहू शकता, नरकाची शक्यता तुमच्या मनात डोकावत नाही म्हणून नव्हे, तर तुमची विवेकबुद्धी अधिक बळकट करून तुम्ही तसे करू शकता. नरक आपल्या मनात कधीही डोकावणार नाही याची काळजी तुम्ही घेऊ शकता.तसे शक्य नाही म्हणून नव्हे, तर तुम्ही सतर्क आहात म्हणून. सतर्क राहण्याची ही क्षमता एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच असते. पण तसे करण्यास सक्षम असणारी सर्व साधने तुम्ही जर दूर केलीत तर तुम्ही अशा अंधार्‍या खोलीत बसाल ज्या ठिकाणी पांढरा किंवा निळा यापैकी कोणताही प्रकाश असण्याची शक्यता नाही. पण तुम्ही अशा दिशेला वळले आहात जिथे कोणताही प्रकाश असल्याने काहीही फरक पडत नाही. दिवा असल्याने केवळ त्याच व्यक्तीला फरक पडतो जिला डोळे उघडून कोठेतरी जायचे आहे. ज्या व्यक्तीने तिचे डोळे झाकून घेतले आहेत आणि ती दुसर्‍याच एखाद्या ठिकाणी आहे तिला प्रकाश असल्याने किंवा नसल्याने काहीही फरक पडत नाही. त्या व्यक्तीसाठी प्रकाश हा एक उपद्रवच आहे.

भेदुयात कवच!

म्हणूनच असत्याकडून सत्याकडे पोहोचण्याची प्रक्रिया कोणतेही भौगोलिक अंतर पार करण्याविषयी नाही. हे एखाद्या अंड्याच्या कवचासारखे आहे – सध्या तुम्ही कवचाच्या बाहेर आहात. तुम्ही जर आत जायचे ठरवले, आणि तुम्ही अंड्यावर टक टक मारायला सुरुवात करता. तुम्हाला वाटते, की तुम्ही आत जाऊ शकाल,पण तसे होत नाही, कोंबडीचे पिल्लुच बाहेर येईल– हेच सत्य आहे. तुम्ही आत जाण्याची इच्छा धरून इथे बसलेले आहात. तुम्ही जेंव्हा ते फोडता, तेंव्हा कोणीही आत जाऊ शकत नाही, पण एक संपूर्णतः नवीन संभावना उभारून येते. म्हणूनच योगामध्ये सहस्रार, सहस्त्र पाकळ्या असलेले फुल बाहेर येत असल्याचे एक प्रतीक आहे. तुम्ही जेंव्हा कवच फोडता, तेंव्हा तुम्ही ज्याची कधीही कल्पना केली नव्हती अशी एखादी वेगळी गोष्ट त्यातून बाहेर येते.

असत्याकडून सत्याकडे पोहोचण्याची प्रक्रिया कोणतेही भौगोलिक अंतर पार करण्याविषयी नाही.

तुम्हाला जर हे कवच फोडायचे असेल, तर तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी तसे कधीही करू शकणार नाही कारण ते कवच म्हणजेच तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतःच स्वतःला कसे तोडू शकाल? अजूनही तुमची तशी हिंमत होणार नाही. तुमचे मन कदाचित म्हणेल, “हो, मला हे मोडू दे, आणि त्यातून एक कोंबडीचे पिल्लु बाहेर येईल.” पण नाही, तुम्ही स्वतःच ते मोडण्याचे धाडस कधीही दाखवू शकणार नाही.

आणि म्हणूनच, तुम्ही बाहेरून एक हाथोडी शोधता, ज्याला सर्वसाधारणपणे कृपा असे संबोधले जाते. तुम्ही स्वतःला अशा प्रकारे तयार करता की ती तुमच्याकडे आकर्षिली जाते. हे असे आहे, की जेंव्हा एखाद्या लहान मुलाचा दात हलायला लागतो, तेंव्हा “त्याला हात लावु नका, हात लावु नका!” असे तो म्हणत राहतो,पण पालक म्हणतात, “पाहू दे मला, पाहू दे मला,” असे म्हणत ते तो दात खेचून बाहेर काढतात. दात सहजपणे तुमच्या हातात येतो, आणि तो बाहेर आलेला पाहून मुलाला देखील अतिशय आनंद होतो. तुमचा दात नुकताच बाहेर पडल्यावर झालेला आनंद तुम्हाला आठवतो आहे का? सर्व वेदना नाहीशा झालेल्या असतात आणि केवळ एक रिकामी पोकळी शिल्लक असते. तुम्ही अनेक दिवस तो स्वतःच काढून टाकण्याचा प्रयत्न करत असता, पण तुम्हाला स्वतःच तो बाहेर ओढून काढणे कधीच शक्य झाले नसते. म्हणून आपण फक्त त्या क्षणाची वाट पाहत असतो. साधना अगदी तशीच आहे– तुमचे तोंड उघडून ठेवण्यासारखे. पण हे तितके सोपे नाही हे ही तितकेच खरे आहे!

Editor’s Note: Find more of Sadhguru’s insights in the ebook “From Creation to Creator”, available at Isha Downloads. Pay what you wish and download it. Enter “0” or click “Claim for free” for a free download.