सद्गुरु: ईश्वरावर विश्वास ठेवावा की नाही लोकं मला नेहेमी हा प्रश्न विचारत असतात. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे: तुम्हाला दोन हात आहेत, यावर तुमचा विश्वास आहे, की तुम्हाला दोन हात आहेत हे तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला दोन हात आहेत हे माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या हातांकडे पाहण्याची आवश्यकता भासत नाही, कारण तुमच्या अनुभवातून ते आहेतच याची तुम्हाला माहिती आहे. असे का होते, की जेंव्हा हाताचा विषय येतो, तेंव्हा आपल्याला माहिती असते, परंतु देवाचा विषय निघाल्यावर आपण विश्वास ठेवतो? त्याचे कारण हे आहे, की तुम्हाला माहित नाही हे स्वीकारण्या येवढे आपण प्रामाणिक नाही.

मला माहित नाही हे मान्य करण्या एवढे आपण सरळ नसल्यामुळे आपण विश्वास ठेवू लागतो. “मला माहित नाही” ही एक खूप मोठी शक्यता आहे. “मला माहित नाही” याची जेंव्हा तुम्हाला जाणीव होते, तेंव्हाच तुमच्यात ज्ञानप्राप्तीची आस निर्माण होते. जेंव्हा ज्ञानप्राप्तीची आस निर्माण होते, तेंव्हा साधना केली जाते. जेंव्हा साधना केली जाते, तेंव्हा ज्ञानप्राप्तीची शक्यता निर्माण होते. परंतु, आपण आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टीवर फक्त विश्वास ठेवलात, तर तुम्हाला कधीही सत्य, ज्ञान प्राप्ती होणार नाही याची तुम्ही खात्रीच करून घेतलेली असते.

 

“मला माहित नाही” ही एक प्रचंड संभावना आहे

दुसर्‍या बाजूला काय आहे यावर विश्वास ठेवला तर खरी ज्ञानसाधना सुरू होणारच नाही. जेंव्हा एखाद्या व्यक्तीला माहिती नसते तेंव्हाच त्याची खरोखरच साधनेची इच्छा असते. साधनेची सुरुवात नेहेमीच “मला माहिती नाही” यापासून सुरू होते. तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्हाला
माहिती करून घेण्याची इच्छा आहे. ही इच्छा एका विशिष्ट निरासग स्थितीतून, अशी एक पोकळी ज्यामधून तुम्हाला बाहेर यायचे असते. साधना म्हणजे शोध घेणे आहे – ते काय आहे याची आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण साधना करत आहात, आपण आपला मार्ग शोधत आहात.

आपण जेंव्हा “शिव” असे म्हणतो, तेंव्हा आपण एखाद्या देवाविषयी बोलत नाही. “शिव” या शब्दाचा अर्थ “ते, जे नाही ते” असा आहे.”

या जगात, दुर्दैवाने बहुतांश व्यक्तींची प्रयत्न करण्याची इच्छा नाही, आणि म्हणून विश्वास, धारणा प्रणाली त्यासाठीचा सोपा पर्याय बनलेल्या आहेत. आपण केवळ विश्वास ठेवतो: “होय, दैवी शक्ती अस्तीत्वात आहे. होय, अमानवी दुष्ट शक्ती अस्तीत्वात आहेत.” यामुळे आपण स्वतःला मूर्ख बनवू शकता, परंतु त्याला काहीही अर्थ नाही, कारण आपण आपल्या मनाची तशी समजूत घातलेली आहे.

लोकांच्या अनेक विश्वास प्रणाली आहेत. लोकं स्वर्गाविषयी कल्पना करतात आणि इथं न मिळालेल्या गोष्टी उपलब्ध असणार्‍या जागेची कल्पना करतात – भोजन, स्त्रिया, देव किंवा आणखी काही. आपण या ठिकाणी ज्या गोष्टींपासून वंचित आहात त्या सर्व गोष्टी, “वरती तेथे आहेत” असे आपण म्हणता. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये आपण “शि-व” असे म्हणतो, ज्याचा अर्थ “ते, जे नाही ते” असा आहे.

आपण जेंव्हा “शिव” असे म्हणतो, तेंव्हा आपण एखाद्या देवाविषयी बोलत नसतो. “शिव” या शब्दाचा अर्थ “ते, जे नाही ते” असा आहे. आज भौतिकशास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की या जगाची निर्मिती शून्यातून झालेली आहे आणि त्याचा अंतसुद्धा शून्यामध्येच होणार आहे. हे अथांग शून्यत्व किंवा पोकळी अस्तित्वाचा आधार आहे आणि तेच या विश्वाचा मूलभूत गुण आहे. अब्जावधी आकाशगंगा या अथांग शून्यत्वातील छोटेसे प्रकाशकिरण आहेत, आणि हि पोकळी किंवा शून्यत्वालाच आपण “शिव” असे संबोधतो.

शून्यत्वाची कल्पना करा

तर मग, वरती आहे तरी काय? काहीही नाही. आपण काहीही नसण्याची कल्पना कशी करू शकतो? प्रयत्न करा आणि पहा! आपण आपल्याला जितके अधिक गुंतवून घेऊ, तितके आपल्या मनात असलेले सर्व आकार नाहीसे होत जातील. या संस्कृतीत, आपल्याला सतत “शिव” असे म्हणायला सांगितले आहे कारण आपण निर्माण केलेल्या प्रत्येक रूपाचा नाश करण्याविषयी बोलत आहोत. आपण देव, दानव, किवा भूत यापैकी काहीही निर्माण केले असले तरी काही हरकत नाही. तुम्हीच त्यांची निर्मिती केली. तुम्ही जर त्यांना खाली उतरवून ठेवले नाही, तर मग आपण सत्याकडे; ते जसे आहे त्या स्वरुपात कधीच पाहू शकणार नाही. तुम्ही नेहेमी या गोष्टी तुमच्या अवती भोवती वास
करत आहेत अशी कल्पना करत राहाल.

आपण “शिव” म्हणतो कारण आपण जे नाहीये त्याची संकल्पना करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण त्यासाठी जितका अधिक प्रयत्न कराल, मन तितके अधिक शुद्ध आणि स्थिर बनेल.

आध्यात्मिक प्रक्रियेचे मूलभूत तत्व हे आहे की आपण काहीही गृहीत धरत नाही. आपण जेंव्हा “शिव” असे म्हणतो, तेंव्हा आपण असे समजत नाही की शिव तेथे वरती बसलेले आहेत. आपण केवळ तो ध्वनी, एक साधन म्हणून वापरता. हा ध्वनी कोणत्याही आधाराशिवाय देण्यात आलेला नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनींचा आपल्यावर काय परिणाम होतो याचे आम्ही निरीक्षण केले आहे आणि ते समजावून घेतलेले आहे. शि-व हा एक संकल्पना जाळून टाकण्याचा मार्ग आहे, ज्यामुळे प्रत्येक क्षणी जीवन नव्याने सुरू होते. आपले मानसिक अवकाश एखाद्या नितळ आरशासारखे बनेल. ते फक्त तेथे काय आहे येवढेच तुम्हाला दाखवेल, त्यापेक्षा अधिक काहीही नाही. आणि आपले मन सुद्धा तसेच असायला हवे. असे एक उपयोगी मन आहे. सध्या त्याला अनेक गोष्टी चिकटून बसल्या आहेत. विचार करा, जर आपल्या घरातील आरसा असा बनला तर काय होईल: जो कोणी त्याच्या समोर उभा राहील, तर ते त्याचे फक्त 10% प्रतिबिंब दाखवेल. थोड्याच वेळात तो निरुपयोगी बनेल.

जेंव्हा आपण ज्याची संकल्पना करता येत नाही त्याची संकल्पना करण्याचा प्रयत्न करत असतो, तेंव्हा ज्याला काहीही आकार नाही असे काहीतरी पाहण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपण जर निरंतरपणे असे प्रयत्नशील झालात, तर ती एक साधना आहे. मग तुम्ही भौतिक सृष्टीच्या पलीकडे जाल. तुम्ही जर भौतिकता दूर केलीत आणि तरीही तुम्ही जर येथे असलात, तर त्याचा अर्थ असा आहे की आपण एका वेगळ्या आयामाला स्पर्श केला आहे. आणि ती वेगळी गोष्ट म्हणजे, आपण तिला “ते जे नाही ते” असे म्हणतो.

म्हणून आपण “शिव” असे म्हणतो, कारण आपण जे अस्तीत्वात नाही त्याची संकल्पना करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही जितकी अधिक तीव्रतेने ही साधना कराल, मन तितके अधिक शुद्ध आणि स्थिर बनेल. आपल्याला काय आवडते आणि काय आवडत नाही, आपण कशावर प्रेम करतो आणि कशाचा तिरस्कार करतो, सारे काही दूर होईल. एकदा जर का तुमचा आरसा नितळ, स्वछ झाला, की तुम्ही प्रत्येक गोष्ट ती जशी आहे त्या स्वरुपात पहाल, कारण तुमच्या मनाचे अवकाश हेच एकुलते एक क्षेत्र आहे जिथे अस्तीत्वातील एकूणएक गोष्ट तुम्ही पाहू शकता. आपण जर ते स्वच्छ आणि नितळ ठेवले नाही, तर आपण आपली स्वतःचीच भुते त्यामध्ये पाहू.

भूतांशी सामना

मी तुम्हाला एक विनोद सांगतो. एकदा एक मनुष्य वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाला. तो अगदीच साधा सज्जन मनुष्य होता आणि त्याला संपूर्ण कपडे उतरवून शारीरिक तपासणी केली जाण्याचा कोणताही अनुभव नव्हता. हे करा, ते करा, वजन, ऊंची, ट्रेडमिल – सर्व प्रकारच्या गोष्टी. हे सर्व सुरू असताना, काही कारणाने त्यांनी त्याला शौचालयात जाऊ दिले नाही, आणि तो स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकला नाही आणि त्याने पलंगाच्या चादरीतच विधी उरकले! त्याने चादरीत काय केलंय हे त्याच्यावर लक्ष ठेवणार्‍या सुंदर परिचारिकेने पाहू नये अशी त्याची इच्छा होती कारण तो अगदीच साधा सरळ मनुष्य होता. म्हणून त्याने ती चादर उचलली आणि तिसर्‍या मजल्याच्या खिडकीतून ती खाली भिरकावून दिली.

एक दारुडा त्या रस्त्यावरून त्याच्याच धुंदीत चाललेला होता. अचानक एक पांढरी चादर उडत खाली आली आणि त्याच्या अंगावर पडली. त्याने आपले हातपाय हलवायला सुरुवात केली आणि ती चादर त्याच्या अंगाभोवती गुंडाळली गेली. मोठ्या प्रयत्नांनी त्याने ती चादर दूर केली आणि ती चादर त्याच्या पायाशी पडली. त्याने त्या चादरीकडे पाहिले. तेवढ्यात कोणीतरी तेथे आले आणि त्याला विचारले, “काय झाले?” त्याने उत्तर दिले, “मला वाटते की मी एका भूताला इतका चोप दिला की त्याची चड्डीच पिवळी झाली!” बहुतांश व्यक्तींच्या बाबत असेच होते. तुम्ही अस्तीत्वात नसलेल्या भूतांशी लढा देत आहात. अशा भूतांशी तुम्ही लढा देऊन त्यांच्यावर विजय मिळवू शकता, परंतु तुम्ही त्यांच्यावर जितके अधिक विजय मिळवाल, तेवढा अधिक तुमचाच पराभव होईल.

आध्यात्मिक शोध म्हणजे काहीतरी कल्पना करून तेथपर्यंत पोहोचणे असा नाही – तो मूर्खपणा आहे. तुम्ही कसलीच कल्पना करू नका. कोणतीही कल्पना न करणे तुम्हाला कसे शक्य आहे? कारण एकदा स्मृती असली आली, की कल्पना येणारच. म्हणून हे साधन देण्यात आले – जे अस्तित्वातच नाही त्याची संकल्पना करणे. अधिक तीव्रतेने प्रयत्न करा, आणि तुमच्या हे लक्षात येईल की मन अगदी हलके झाले आहे!

Editor’s Note: Celebrate Mahashivratri at the Isha Yoga Center with explosive guided meditations accompanied by dance and music, nightlong satsang with Sadhguru, musical performances by eminent artists. Bask in the Grace of Shiva, The AdiYogi! Visit the Mahashivratri webpage for details on the many ways you can participate.