सद्गुरु: तुम्ही जर कोयंबतूर पासून दिल्ली पर्यन्त विमानाने प्रवास केलात, आणि प्रत्येक पाच मिनिटांनंतर खाली पाहिलेत, तर पश्चिम घाटांचा अपवाद वगळता, तुम्हाला फक्त तपकिरी रंगाचे वाळवंटच दिसेल. हे फक्त जाणीवपूर्वक न केलेल्या शेतीमुळे असे घडले आहे. आज भारतातील एकूण जमिनीपैकी चौर्‍यांशी टक्के जमीन शेतीने व्यापलेली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या समयी जवळ जवळ ९३ टक्के जनता शेती व्यवसायात गुंतली होती. हे परंपरागतपणे आपण शेतकरी होतो म्हणून नव्हे. जर तुम्ही या देशाच्या इतिहासावर नजर टाकलीत, तर तुम्हाला दिसेल की जगातील एकूण निर्यातीपैकी तीन टक्के निर्यात भारतातून होत असे. आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के जनता वस्त्रनिर्मिती व्यवसायात गुंतलेले होते. आपण कधीही कच्च्या कापसाची निर्यात केली नाही कारण आपल्या कापसाचा दर्जा काही फारसा चांगला नाही. पण त्या अतिशय कमी दर्जाच्या कापसापासून, आणि रेशीम, ताग अशा इतर सर्व प्रकारच्या धाग्यांपासून, आपण वस्त्रांच्या स्वरुपात जादूच निर्माण केली. आपण वेगवेगळ्या एकशे चाळीस पेक्षा आधिक प्रकारच्या विणण्याचे प्रकार निर्माण केले आणि त्यापासून अशी काही जादू निर्माण केली की संपूर्ण जग आपल्या उत्पादनांने मोहित झाले होते.

पण 1800 ते 1860 च्या दरम्यान, आपली वस्त्र निर्यात चौऱ्याण्णव टक्क्यांनी कमी झाली.  हे अपघाताने नव्हे तर  योजनाबद्ध प्रयत्न झाल्यामुळे घडले होते. ब्रिटीशांनी हातमाग मोडले, त्यांनी बाजारपेठ उध्वस्त केली, त्यांनी प्रत्येक गोष्टीवर तिप्पट कर लादला, आणि त्यांनी कापडाची आयात करायला सुरुवात केली. ब्रिटिश गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग म्हणाले, “कापूस विणकरांच्या अस्थी भारतातील जमिनीत गाडल्या जात आहेत.” लक्षावधी माणसे त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेतल्यानंतर उपासमारीने मृत्यूमुखी पडले.  उरलेल्या लोकांनी जमीन खणायला सुरुवात करून कशी तरी आपली उपजीविका करायला सुरुवात केली. सर्वत्र उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करण्याची सुरुवात झाली.

मी असा कायदा आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे, की तुमच्या मालकीची एक हेक्टर जमीन असेल, तर त्या जमिनीवर तुमच्याकडे सक्तीने किमान पाच गो-जातीय प्राणी पाळले पाहिजेत. अन्यथा ती जमीन तुमच्याकडून काढून घेण्यात येईल, कारण तुम्ही त्या जमिनीचा विनाश करत आहात.

हे पारंपरिक शेतकरी नव्हते तर वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविध कामे करणारे लोक होते आणि त्यांनी इतर कुठल्याच उपाया अभावी शेती करण्यास सुरुवात केली.  1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा भारताच्या लोकसंख्येच्या ९३ टक्क्यांपेक्षा अधिक जनता शेती करत होती. आज हे प्रमाण सत्तर टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येकी दहा लोकांसाठी सात लोकं अन्न उगवण्याचे कार्य तयार करत आहेत. हे काही फारसे कार्यक्षम नाही, होय ना? कारण आपण जमिनीचा प्रत्येक तुकडा अगदी थोडेसे उत्पादन करण्यासाठी अक्षरशः ओरबाडून काढत आहोत. आपण जर कोणत्याही प्रकारे आपल्या शेती करण्याच्या स्वरुपात क्रांती घडवून आणली नाही, तर या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही.

भारतात, लोकं हजारो पिढ्यांपासून तीच जमीन कसत आहेत. पण गेल्या पिढीत, जमिनीची गुणवत्ता येवढी खराब झाली आहे, की ती आता वाळवंटात रुपांतर होण्याच्या मार्गावर आहे. याचे कारण सर्वत्र झाडे तोडण्यात आली आहेत आणि आपल्या देशातून लक्षावधी  जनावरांची निर्यात केली जात आहे. आपण हे समजावुन घेतले पाहिजे, हे प्राणी नव्हेत – तर ते आपल्या देशाची सुपीक माती आहेत जे इतर कोणत्या देशात चालली आहे. जेंव्हा असे घडते, तेंव्हा तुम्ही नवीन माती कोठून आणणार? तुम्हाला जमिनीचे जतन करायचे असेल, तर त्यात सेंद्रिय पदार्थ जाणे आवश्यक आहे. त्या जमिनीत जर झाडांचा पालापाचोळा नसेल, आणि प्राण्यांची विष्ठा नसेल, तर तुम्ही त्यामधून काहीही उगवू शकत नाही. प्रत्येक शेतकरी कुटुंबाला हे सोपे ज्ञान माहिती होते – विशिष्ट आकाराच्या जमिनीसाठी किती प्राणी आणि किती झाडे असणे आवश्यक आहे.

या देशात ज्या ठिकाणी मातीची गुणवत्ता चांगली आहे अशा ठिकाणी तुम्ही गेलात आणि त्या जमिनीतील एक घनमिटर माती काढून घेतलीत, तर असे म्हंटले जाते की त्या एक घनमीटर मातीमध्ये जवळजवळ 10,000 विविध प्रकारच्या जीव-जंतूंच्या प्रजाती आढळून येतात. या पृथ्वीवर इतरत्र कोठेही एकत्रितपणे आढळून येणार्‍या जीव प्रजातीत हे प्रमाण सर्वाधिक आहे.

एक राष्ट्रीय म्हत्वाकांक्षा होती, जिचा समावेश जुन्या नियोजन आयोगात करण्यात आला होता, की भारतातील ३३ टक्के भूभाग झाडांच्या सावलीने झाकला गेला असावा, कारण तुम्हाला मातीचे जतन करायचे असेल तर तोच एकमेव उपाय आहे. आणि मी असा कायदा आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे, की तुमच्या मालकीची एक हेक्टर जमीन असेल, तर त्या जमिनीवर तुमच्याकडे सक्तीने किमान पाच गो-जातीय प्राणी पाळले पाहिजेत. अन्यथा ती जमीन तुमच्याकडून काढून घेण्यात येईल, कारण तुम्ही त्या जमिनीचा विनाश करत आहात.

या भूमीबद्दल एक अतिशय विलक्षण गोष्ट आहे ज्यासाठी आमच्याकडे वैज्ञानिक डाटा आहे पण अद्याप शास्त्रीय तर्क मात्र उपलब्ध नाही. या देशात ज्या ठिकाणी मातीची गुणवत्ता चांगली आहे अशा ठिकाणी तुम्ही गेलात आणि त्या जमिनीतील एक घनमिटर माती काढून घेतलीत, तर असे म्हंटले जाते की त्या एक घनमीटर मातीमध्ये जवळजवळ 10,000 विविध प्रकारच्या जीव-जंतूंच्या प्रजाती आढळून येतात. या पृथ्वीवर इतरत्र कोठेही एकत्रितपणे आढळून येणार्‍या जीव प्रजातीत हे प्रमाण सर्वाधिक आहे.  असे का आहे हे आम्हाला माहिती नाही. तर या मातीला फक्त थोड्या मदतीची आवश्यकता आहे. तुम्ही तिला आवश्यक असणारे थोडे सहाय्य केले, तर तीची गुणवत्ता पुन्हा वेगाने सुधारेल. पण एक पिढी म्हणून, आपल्याकडे ते थोडेसे सहाय्य करण्याची बुद्धी आपल्यात आहे का? की आपण काहीही कृती न करता नुसते बसून ही जमीन मृत होताना पाहणार आहोत?

उदाहरणार्थ, कावेरीच्या खोर्‍याचे क्षेत्र ८५००० चौरस किलोमीटर येवढे आहे. गेल्या पाच वर्षात, सत्याऐंशी टक्के हरित आवरण काढण्यात आले आहे. म्हणून मी कावेरी नदीचे पुंनरुज्जीवन करण्यासाठी कावेरीची हाक ही मोहीम सुरू करत आहे. कावेरी खोर्‍यातील एक तृतीयांश भाग व्यापण्यासाठी आपल्याला २४२ कोटी वृक्षांशी लागवड करणे आवश्यक आहे. म्हणजे 2.42 अब्ज झाडे. ही झाडे ईशा फाऊंडेशन लावणार आहे असे नाही. आम्हाला शेती आधारित जंगले निर्माण करण्याची चळवळ सुरू करायची आहे, आणि याद्वारे आम्ही शेतकर्‍यांना असे दाखवून द्यायचे आहे की त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम आर्थिक मॉडेल आहे.

कर्नाटकातील शेतकर्‍यांचे सरासरी उत्पन्न प्रति हेक्टर 42,000 रुपये, आणि तामिळनाडु मधील शेतकर्‍यांचे सरासरी उत्पन्न प्रति हेक्टर सरासरी 46,000 रुपये येवढे आहे. पहिल्या पाच वर्षांमध्ये, पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न, आम्ही ते प्रतिवर्ष सरासरी 45,000 रुपयांपासून 3,60,000 रुपये येवढे बदलू. एकदा लोकांना याचा आर्थिक फायदा दिसला, की त्यानंतर तुम्हाला त्यांची मन धरणी करण्याची गरज भासणार नाही. ते तसेही करतीलच. जर प्रत्येकाने आपल्या एकूण शेतीच्या एक तृतीयांश जमीन शेती आधारित वनीकरणासाठी वापरली, तर त्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढेल आणि मातीची गुणवत्ता सुद्धा सुधारेल.

Editor’s Note: Cauvery Calling is a campaign to support farmers in planting 242 crore trees and save Cauvery. This will increase water retention in the basin, while improving the income of farmers five-fold. Contribute to plant trees. Visit: CauveryCalling.Org or call 80009 80009. #CauveryCalling