FILTERS:
SORT BY:
संपन्नता म्हणजे तुमचे कपडे, घर किंवा गाडी नव्हे. खरी संपन्नता म्हणजे तुम्ही किती हर्षभरित, प्रेमळ आणि परमानंदी आहात.
शरीरासाठी श्वास आणि हृदयाचे ठोके महत्त्वाचे आहेत. मानवासाठी ध्यानस्थ असणे महत्त्वाचे आहे.
योग म्हणजे एकत्व. योग म्हणजे सर्वोच्च सशक्तीकरण देखील आहे. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीशी एकरूप असाल, तर ते एक प्रचंड सशक्तीकरण आहे.
एकाग्र, सक्षम आणि प्रेरित तरुणाई तयार करण्याने, भारत हा जगाने आजवर पाहिलेला सर्वात मोठा चमत्कार बनेल.
तुमची स्वप्ने सत्यात उतरू नयेत, तुमच्या आशा पूर्ण होऊ नयेत, कारण तुम्हाला जे माहित आहे त्यावरच ते आधारित आहेत. अशा शक्यतांचा शोध घ्या ज्यांना यापूर्वी कधीही स्पर्श केला गेला नाहीये.
आजपासून पुढे, बोजडपणे जगू नका. जीवनात जे काही करत असाल, जे काही घडत असेल - ते उत्साहाने, आनंदाने जगा.
संक्रांती हा आपल्या जीवनाला घडवणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उत्सव आहे – माती, प्राणी, हवा, पाणी आणि मानव. आनंद साजरा करा!
कर्माचा संबंध चांगलं आणि वाईट यांच्याशी नाही. ते फक्त कारण आणि परिणाम याबद्दल आहे.
जेव्हा तुम्ही आनंदी असता, तेव्हा तुमचा कोणाशीही संघर्ष नसतो, आणि तुम्ही सर्वात अद्भुत गोष्टी करता.
प्रेम तुम्हाला आकलन देत नाही. ते केवळ तुम्हाला योग्य उद्देश देतं.
गत वर्षाचा भार उतरवून, ताजेतवाने आणि उत्साही होऊन बाहेर पडण्याची हीच वेळ आहे.
तुमच्या जीवनात कोणत्याही परिस्थिती आल्या, तरी तुम्ही त्यातून अधिक सामर्थ्याने बाहेर पडू शकता किंवा त्यांच्यामुळे खचून जाऊ शकता. ही निवड तुमच्याकडे आहे.