Wisdom
FILTERS:
SORT BY:
कर्माचा संबंध चांगलं आणि वाईट यांच्याशी नाही. ते फक्त कारण आणि परिणाम याबद्दल आहे.
जीवनाचे रहस्य हे आहे की, प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने न पाहता, त्यात संपूर्णपणे सहभागी असणे. एखाद्या खेळाप्रमाणे. सहभागी, पण न गुंतलेले.
तुमच्याकडे जे काही आहे – तुमचं प्रेम, तुमचा आनंद, तुमची कौशल्ये – ते आत्ताच दाखवा. त्यांना दुसऱ्या जन्मासाठी राखून ठेवण्याचा प्रयत्न करू नका.
आपल्याला पुनर्निर्मितीचं जीवन जगायचं नाही. आपल्याला स्वतःच्या जीवनाचं लेखन स्वतःच करायचं आहे.
तुमच्या जीवनात कोणत्याही परिस्थिती आल्या, तरी तुम्ही त्यातून अधिक सामर्थ्याने बाहेर पडू शकता किंवा त्यांच्यामुळे खचून जाऊ शकता. ही निवड तुमच्याकडे आहे.
निर्मितीचा प्रत्येक पैलू – वाळूच्या कणापासून ते पर्वतापर्यंत, थेंबापासून ते सागरापर्यंत – हे सर्व मानवी बुद्धीच्या पलीकडील बुद्धिमत्तेचे प्रकटीकरण आहे.
व्यक्तिगत परिवर्तनाशिवाय तुम्ही जगात परिवर्तन आणू शकत नाही.
विश्वास ठेवणे म्हणजे तुम्हाला जे खरोखर माहित नाही, ते गृहीत धरणे. शोधणे म्हणजे तुम्हाला माहित नाही हे ओळखणे.
जर तुम्ही तुमच्यातल्या जीवनाकडे लक्ष दिलं, तर ते तुमच्या आत बहरून येईल.
जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी असेल, तर तुम्ही स्वतःला अशा प्रकारे बनवलं पाहिजे की, तुमच्यासोबत असण्याचा त्यांना आनंद वाटायला हवा.