FILTERS:
SORT BY:
जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्मृतींमध्येच वावरता, तेव्हा तुमच्या समोर काय आहे हे तुम्ही पाहू शकत नाही.
विश्वासाचा अर्थ असा नाही की, इतरांनी गोष्टी अगदी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच केल्या पाहिजेत. विश्वास म्हणजे जाणीवपूर्वक असुरक्षित असणे.
तंत्रज्ञान मानवापेक्षा अधिक वेगाने विकसित होत आहे. जोपर्यंत आपण तंत्रज्ञानापेक्षा अधिक वेगाने विकसित होत नाही, तोपर्यंत आपण त्याचा वापर कधीच सुज्ञपणे करू शकणार नाही.
योग हा काही व्यायामाचा एक प्रकार नाही. तो अस्तित्वात असण्याचा एक मार्ग आहे.
तीच समस्या पुन्हा पुन्हा उद्भवत आहे, याचा अर्थ तुम्हीच समस्या आहात.
बरीचशी माणसं स्वतःच्या आत असणाऱ्या आंतरिक प्रतिभेला कधीही स्पर्श न करताच जगतात आणि मरतात.
तमिळ नववर्षाच्या आगमनासोबतच, सूर्याची ऊर्जा आपल्यासाठी सर्वाधिक अनुकूल ठरते. या जीवनातून स्वतःला ओढत नेऊ नका - तर नव्या जोमाने आणि प्रखरतेने स्वतःला त्यात पूर्णपणे झोकून द्या.
हे शरीर पृथ्वीचाच एक अंश आहे. निरोगी पृथ्वीशिवाय चांगले जीवन शक्य नाही.
केवळ मूर्ख लोकच उथळ चर्चेमुळे दुखावले जातात. अशी चर्चा करणारे मात्र स्वतःचेच सर्वाधिक नुकसान करून घेत असतात.
प्रेम ही एक मुक्त करणारी शक्ती आहे; बंधन मात्र गुंतवून टाकणारी प्रक्रिया आहे.
ज्यांना जमिनीवर स्वतःच्या पाऊलखुणा ठामपणे उमटवायच्या आहेत, ते कधीच भरारी घेणार नाहीत.