Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
तुम्ही ज्या कोणाला भेटाल, त्यांच्याशी अशा प्रकारे बोला की, जणू ही तुमची शेवटची संधी आहे. असे केल्याने तुमचं जीवन बदलून जाईल.
शिस्त म्हणजे नियंत्रण नव्हे. नेमके काय आवश्यक आहे, ते करण्याची समज म्हणजेच शिस्त.
तुम्ही एखाद्याशी किती सुंदरपणे संबंध ठेवू शकता हे केवळ तुमची इच्छाशक्ती, लवचिकता आणि आनंद यावर अवलंबून आहे.
वेळ म्हणजे पैसा नाही. वेळ म्हणजे जीवन.
शंका घेणं चांगलं आहे - याचा अर्थ तुम्ही सत्याचा शोध घेत आहात. संशय हा एक रोग आहे.
स्त्रीला पुरुषांच्या जगात जागा मिळवण्याची गरज नसावी. तसेही अर्धे जग तिचेच आहे.
जीवनाला अपयश माहित नाही. अपयश फक्त त्यांच्यासाठी अस्तित्वात असतं, जे नेहमी स्वतःची तुलना इतरांशी करतात.
जगाला तुम्ही विचित्र वाटलात तरी ते ठीक आहे. प्रत्येक जण वेगळा आहे, म्हणून प्रत्येक जण कुणाच्या तरी नजरेत विचित्र ठरतो. आनंदाने विचित्र असणे किंवा दु:खामुळे विचित्र असणे - ही निवड तुमची आहे.
मानव स्वतःच्या आठवणी आणि कल्पनेमुळे; म्हणजेच जे अस्तित्वात नाही, त्यामुळे त्रास सहन करतात.
तुमच्या अनुभवाची गहनता लक्ष देण्याच्या सखोलतेमुळे ठरते. जर तुमचे लक्ष सखोल असेल, तर जीवनाचा अनुभव गहन असेल.
तुमचं व्यक्तिमत्व जितकं कमी ताठर असेल, तितकी तुमची उपस्थिती अधिक प्रभावशाली असेल.
तुम्ही ईच्छुक असाल, तर तुमच्या तार्किक समजुतीच्या पलीकडे देखील मी उपलब्ध आहे.