Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
नवीन, आव्हानात्मक परिस्थिती या संधी आहेत, समस्या नाहीत. तुमच्या आयुष्यात जर काहीच नवीन घडत नसेल, तर ती खरी समस्या असेल.
जीवन शक्तीने सामर्थ्यवान झालेली कल्पना, वास्तवात साकार होईल.
जे तुमच्या जाणिवेत आहे तेच तुम्हाला माहीत असतं - बाकी सगळ्या कल्पना आहेत. योग हे जाणीव वाढवण्याचं विज्ञान आहे.
एकदा का तुम्हाला तुमच्या नश्वरतेची सतत जाणीव झाली की, तुमचा आध्यात्मिक शोध अखंडित असेल.
भक्तीभाव म्हणजे तुमच्या संपर्कात असणाऱ्या गोष्टींमध्ये विलीन होण्याचा एक मार्ग. जसं की - श्वास, काम, लोक, ग्रह आणि संपूर्ण विश्व.
बाह्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी इतरांच्या सहकार्याची आणि विविध घटकांची आवश्यकता असते. परंतु, आंतरिक स्थिती निर्माण करण्यासाठी तुम्ही स्वतः पुरेसे आहात
जर तुम्ही भूतकाळाला तुमच्या आत जिवंत ठेवाल, तर तुम्ही वर्तमानासाठी मृत व्हाल.
संपत्तीचे रुपांतर कल्याणात होण्यासाठी, तुमच्या आत एक आध्यात्मिक घटक असणं आवश्यक आहे. तसं नसल्यास, तुमचं यश तुमच्याविरुद्ध काम करू शकतं.
सगळं काही एकाच स्त्रोतातून येतं. जेव्हा तुम्ही स्वतःला एक स्वतंत्र व्यक्ती न समजता अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग म्हणून अनुभवता, तेव्हाच तुम्ही संपूर्णपणे सहज बनता.
आनंद ही काही मिळवण्याची गोष्ट नाहीये. ती तुमच्या जीवनाची स्वाभाविक स्थिती असली पाहिजे.
पृथ्वीसारखं, वृक्षासारखं व्हा - केवळ जीवन. तुम्ही जर फक्त जीवन असाल, तर तुमची मानवी चेतना आपोआप प्रकट होईल.
तुमचा शोध जर पुरेसा तीव्र झाला, तर आत्मज्ञान दूर नाही, कारण शेवटी तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते तुमच्या आतच आहे.