Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
लोक कठोर परिश्रम करतात म्हणूनच यशस्वी होतात असं नाही. तर ते फक्त अशा प्रकारे करतात की, त्यातून योग्य तो परिणाम साधला जाईल.
जर तुम्ही तुमच्या मनामध्ये, भावनांमध्ये आणि शरीरामध्ये हवे तसे वातावरण निर्माण करू शकलात, तर तुमचे आरोग्य, आनंद आणि कल्याण यांची काळजी आपोआप घेतली जाईल.
तुम्हाला आवडणाऱ्या सीमांमध्ये वावरण्यापेक्षा, त्या सीमांच्या पलीकडं जाणं जास्त महत्त्वाचं आहे.
कोणतंही काम तणावपूर्ण नसतं. तुमचं शरीर, मन आणि भावना यांना हाताळण्यातली तुमची असमर्थता त्याला तणावपूर्ण बनवते.
पुरेसं लक्ष दिल्यास, जवळजवळ कोणत्याही गोष्टीवर प्रभुत्व मिळवता येऊ शकतं.
जर तुम्हाला जीवनाबद्दल सखोल अंतर्दृष्टी हवी असेल, तर तुमच्याबद्दल असलेल्या इतरांच्या मताचा तुमच्यासाठी काहीच अर्थ असू नये.
कठीण काळातून पार पडताना, तुम्ही जर एक ठराविक आंतरिक कृपा बाळगू शकलात, तर तुम्हाला दिसेल, की आपण सामोरं जातो ती प्रत्येक परिस्थिती ही आपलं जीवन विकसित करण्याची एक संधी आहे.
ध्यान हे तुमच्या अस्तित्वाचं सौंदर्य जाणून घेण्याचं साधन आहे.
योग शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पैलूंवर चमत्कारिकपणे काम करतो. फक्त इतकंच की, तुम्हाला ते करावं लागेल.
या जीवनात तुम्ही पुढे जात आहात, की नाही हे जाणून घ्यायचं असेल, तर फक्त हे पहा, की तुम्ही काल होता त्यापेक्षा आज थोडं अधिक आनंदी आहात का.
तुमच्यासोबत काहीही घडो, एकतर तुम्ही त्याला एक शाप समजून त्रास करून घेऊ शकता, किंवा त्याला एक आशीर्वाद समजून त्याचा उपयोग करू शकता.