Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
स्त्री तत्व हे जीवनाचे एक शक्तिशाली आयाम आहे. स्त्री तत्व किंवा शक्ती या शिवाय, काहीही अस्तित्वात नसेल.
नवरात्री साजरी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे उत्सव भावना जोपासणे. जीवनाचं रहस्य हेच आहे की: गंभीर न होता संपूर्णपणे सहभागी होणे.
जमिनीवर खंबीरपणे उभं राहणं आणि तरीही आकाशाला स्पर्श करणं हे आध्यात्मिक प्रक्रियेचं सार आहे.
ते सोपं असो वा कठीण - तुम्हाला कुठं जायचं आहे त्यावरचं लक्ष कधीही ढळू देऊ नका.
मानव असणे म्हणजे निसर्गाच्या तथाकथित नियमांच्या पलीकडे जाऊन आपल्यापेक्षा मोठं काहीतरी घडवून आणण्याची क्षमता असणे.
तुमच्या पूर्वजांना सापळा नव्हे तर पायरीचा दगड बनवा. महालय अमावस्या ही शक्यता निर्माण करते.
कधीही कोणाबद्दल मत बनवू नका. ते या क्षणी कसे आहेत ते महत्त्वाचं आहे.
कर्म चांगलं किंवा वाईट नसतं. ते एक डिंक आहे जो तुम्हाला या शरीराशी चिकटून ठेवतो. ज्या क्षणी तुम्ही तुमचं सगळं कर्म धुवून टाकाल, त्याच क्षणी तुम्ही निघून जाल.
आत्मसाक्षात्कार हा प्रकाशित होण्याबद्दल नाही - तो प्रकाश आणि अंधार यांच्या पलीकडे असणाऱ्या दृष्टीबद्दल आहे.
तुम्हाला आवडो किंवा न आवडो, जीवन तुम्हाला सर्व प्रकारची सर्कस, खेळ आणि कसरत करायला लावेल. तुम्ही जर तयार आहात, तर ते आनंदाने करू शकता.
शांती आणि आनंद बाजारपेठेत किंवा जंगलात नव्हे, तर ते अंतरंगातच रुजलेलं आहेत.
तुमच्या मुलाला चांगलं वाढण्यासाठी तुम्ही खूप हुशार असण्याची गरज नाही. तुम्ही फक्त आनंदी, प्रेमळ आणि सरळ असलं पाहिजे.