Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
जीवन समावेशक आहे. फक्त तुमचं मन समावेशक नाही.
कृतींची व्याप्ती नव्हे, तर अनुभवांची गहनता आयुष्याला समृद्ध आणि परिपूर्ण बनवते.
पुरुषत्व आणि स्त्रीत्व हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन पैलू आहेत. जर तुम्ही यातील एकाशीच जास्त जोडले गेलात, तर तुमचं आयुष्य अर्धवट राहील.
नवीन, आव्हानात्मक परिस्थिती या संधी आहेत, समस्या नाहीत. तुमच्या आयुष्यात जर काहीच नवीन घडत नसेल, तर ती खरी समस्या असेल.
तुम्ही कसं जेवता यावर फक्त तुमचं शारीरिक आरोग्यच नाही, तर तुम्ही कसा विचार करता, काय अनुभवता आणि आयुष्य कसं जगता हेही अवलंबून असतं.
जर तुम्ही तुमचं मन, शरीर आणि जीवन-ऊर्जेवर थोडं अधिक नियंत्रण मिळवलंत, तर तुम्ही तुमच्या नशिबाचे स्वामी बनू शकता.
नेता होणं म्हणजे परिस्थितीवर वर्चस्व गाजवणं नव्हे. तर लोकांमध्ये असं सामर्थ्य निर्माण करणं की, त्यामुळे ते अशी कामगिरी करू शकतील ज्याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल.
भक्तीभाव म्हणजे तुमच्या संपर्कात असणाऱ्या गोष्टींमध्ये विलीन होण्याचा एक मार्ग. जसं की - श्वास, काम, लोक, ग्रह आणि संपूर्ण विश्व.
स्पष्टता नसलेला आत्मविश्वास नेहमीच विनाशकारी ठरतो.
माती ही केवळ शेतीपुरती मर्यादित नाहीये; ती जीवनाबद्दल आहे. मातीतले सूक्ष्मजीव हे जीवनाचा आधार आहेत. ते जर जगले नाहीत, तर आपणही जगू शकणार नाही.
जो बरं-वाईट आणि आवड-नावड यांच्यात अडकलेला आहे, त्याला प्रेमाची वीण कधीच कळणार नाही.
सगळं काही एकाच स्त्रोतातून येतं. जेव्हा तुम्ही स्वतःला एक स्वतंत्र व्यक्ती न समजता अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग म्हणून अनुभवता, तेव्हाच तुम्ही संपूर्णपणे सहज बनता.