Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
योग म्हणजे स्वतःला वैश्विक भूमितीशी जुळवून घेणे. निर्मितीचा एक भाग बनायचं की निर्मितीच्या स्रोताचाच भाग बनायचं, ही तुमची निवड आहे.
तुम्ही काय करता हा मुद्दा नाही. तुमच्यातील सहभागाची पातळी तुम्हाला रूपांतरित करते.
या पृथ्वीवरील प्रत्येक जीव आपापल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. फक्त मानवच संकोच करतो...
प्रत्येक गोष्टीसाठी - इथं चांगलं जगण्यासाठी आणि या जीवनापलीकडील मुक्तीसाठी - उपाय तुमच्या आत आहे.
एकदा का तुम्ही - तुमचं शरीर आणि तुम्ही, तुमचं मन आणि तुम्ही - यांच्यामध्ये अंतर निर्माण केलं की दुःखाचा शेवट होतो.
आध्यात्मिक बनण्यासाठी तुम्हाला डोंगराच्या गुहेत जाण्याची गरज नाही. आध्यात्मिक प्रक्रियेचा बाहेरील गोष्टींशी काहीही संबंध नाही - तर ती तुमच्या आत घडणारी गोष्ट आहे.
तुमच्या जवळ असलेल्या व्यक्तीवर प्रेम करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. तुमच्या जवळ नसलेल्या व्यक्तीवर प्रेम करणे नेहमीच सोपे असते.
शारीरिक वेदनेबाबत तुमच्याकडे निवड नसते, पण त्याचा त्रास करून न घेण्याची निवड तुम्ही नेहमीच करू शकता.
तुमच्या जीवनातल्या सर्वात सुंदर गोष्टी - प्रेम, सर्जनशीलता, संगीत, नृत्य आणि हास्य - तेव्हाच घडतात, जेव्हा तुम्ही स्वतःला बाजूला ठेवता. त्यागाच्या स्थितीत असण्याचा हर्ष आणि परमानंद तुम्हाला कळो.
जगाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी इंटरनेट ठीक आहे. पण जीवन जाणून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी, तुम्हाला एक 'इनर-नेट' आवश्यक आहे, जे जीवनाला एक गहन अनुभव म्हणून सादर करतं.
अस्तित्वात असं काहीही नाहीये जे आध्यात्मिक नाही. सर्व काही आध्यात्मिक आहे, पण ते अद्याप जाणवलेलं नाहीये.
योगाचा पाया म्हणजे एकाच वेळी पूर्णपणे तीव्र आणि आरामशीर असणे.