यक्ष – नृत्य आणि संगीताचा हर्शोल्ल्हास

ईशा योग केंद्रात (महाशिवरात्रीच्या आधीचे तीन दिवस) 1-3 मार्च या कालावधीत

हजारो वर्षांपासून विकसित झालेले भारतीय कलाप्रकार हे केवळ या देशाच्या संस्कृतीचे प्रतिबिंबच नव्हे, तर आध्यात्मिक प्रेरणेचा स्त्रोत आहेत. त्यांनी या देशातील कित्येक पिढ्यांना समृद्ध केले आहे परंतु आज मात्र आपल्याला त्यांचा विसर पडत चाललेला आहे. देशातील नृत्यकलेची विशिष्टता, शुद्धता आणि विविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी, ईशा फाऊंडेशन दरवर्षी 3 दिवस चालणार्‍या यक्ष या संस्कृतिक, संगीत आणि नृत्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करते. यामध्ये अनेक नामवंत कलाकार आपली कला सादर करतात. भारतीय पुराणकथांनुसार स्वर्गीय व्यक्ती असणार्‍या यक्षांचे नाव दिलेला हा कार्यक्रम अनेक नामवंत कलाकारांना या प्राचीन कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देतो.

आम्ही आपणाला भारताच्या भव्य प्राचीन संस्कृतीच्या परंपरेत आणि या गहन अनुभवात स्वतःला सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहोत.

detail-seperator-icon

कला

यक्ष हा ईशा फाऊंडेशनद्वारे आयोजित केला जाणारा संगीत आणि नृत्याचा वार्षिक महोत्सव आहे. फेब्रुवारी/मार्च मध्ये साजरा केला जाणार्‍या यक्ष या कार्यक्रमात भारतातील अनेक नामवंत कलाकार सहभागी होतात आणि हजारो प्रेक्षक त्याकडे आकर्षित होतात.

1-3 मार्च,2019, ईशा योग केंद्र

शा फाऊंडेशन आपणास आमंत्रित करते ‘यक्ष’ उत्सवात. नामवंत कलाकारांचा सहभाग असणार्‍या तीन दिवसांच्या सांस्कृतिक, सांगीतिक आणि नृत्य सोहळ्यास.

 

मार्च 1

Kalapini Komkali

श्रीमती कलापिणी कोमकली

हिंदुस्तानी वोकल

अतिशय सुमधुर आवाजाची देणगी लाभलेल्या कलापिणी या आजच्या पिढीमधील एक अतिशय प्रतिभावंत आणि प्रशिक्षित शास्त्रीय संगीत गायिका म्हणून ओळखल्या जातात. थोर गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या असलेल्या कलापिणी यांनी आपल्या वडिलांचा तंत्र आणि सर्जनशीलतेचा वारसा पुढे चालविलेला आहे. या वारशावर पकड मिळवत असतानाच अतिशय उत्कृष्ट समज दाखवत त्यांनी स्वतःचा दृष्टीकोण विकसित केला आहे आणि गेल्या दशकात त्यांनी अतिशय संवेदनशील आणि तन्मयतेने गायन करणार्‍या कलाकार म्हणून प्रसिद्धी प्राप्त केली आहे. त्यांच्या सादरीकरणात नवकल्पना, कलात्मक चिंतन, तसेच कंठ संगीतामधील विविध पैलूंचा विचार केलेला दिसतो.

 

मार्च 2

Ranjani-Gayatri

श्रीमती रंजनी-गायत्री

कर्नाटकी वोकल

उच्चभ्रू म्हणून गणल्या जाणार्‍या, आणि सामान्य लोकांसाठी सहजतेने उपलब्ध न होणार्‍या या क्षेत्रात रंजनी आणि गायत्री या दोन भगिनींच्या जोडीने गेली अनेक वर्षे सर्व स्तरांमधील लोकांपर्यन्त त्यांची कला पोहोचवून आनंद दिलेला आहे. एक उच्च दर्जाच्या कर्नाटकी संगीत गायिका म्हणून रजनी आणि गायत्री यांनी त्यांच्या कलेची वैभवशाली परंपरा जपलेली असून त्याच वेळेस त्यांनी त्यामध्ये नावीन्य देखील आणले आहे. त्यांनी वॉशिंग्टन डीसी मधील केनेडी सेंटर, लंडनमधील साऊथबँक सेंटर, इटलीमधील रावेना संगीत समारोह, वॉर्सा-पोलंड मधील क्रॉस कल्चर फेस्टिवल, ढाका येथील बंगाल संगीत समारोह, सिंगापूर येथील एस्पनेड थिएटर यासारख्या प्रतिष्ठित ठिकाणी आपली कला सादर केलेली आहे.

 

मार्च 3

यक्ष उत्सवाच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण दिवसभर भारतीय नृत्यकलेचे प्रदर्शन सुरू राहील
Leela-Samson

लीला सॅम्सन अँड स्पंदा डान्स कंपनी
नदी – द रिव्हर

लीला सॅम्सन या एक विख्यात कलाकार आणि भरत नाट्यम नृत्य प्रकारामधील एक संवेदनशील नर्तकी आहेत. त्या एकपात्री कार्यक्रम सादर करतात आणि त्याबरोबरच स्पंदा डान्स कंपनीसोबत भारतात आणि परदेशात देखील आपली कला सादर करतात. लीला यांना 1982 साली संस्कृती पुरस्कार, 1990 साली पद्मश्री सन्मान आणि 1997 साली नृत्य चुडामणी, 2000 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 2015 साली चेन्नई मधील संगीत अकादमीद्वारे नाट्य कला आचार्य या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
ईशा संमस्क्रीतीद्वारे सादरीकरण
फकिरा खेता खान आणि समुहाद्वारे (राजस्थानी लोकनृत्य) सादरीकरण

द सारी एक्सपीरीयन्स
सारीज: ट्रेडीशन अँड बियॉंड या पुस्तकाची लेखिका आरटीए कपूर चिस्ती यांनी आयोजित केलेल्या विशेष वर्कशॉप आणि वेगवेगळ्या 108 पद्धतींनी साडी नेसण्याच्या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी व्हा.

detail-seperator-icon

यक्ष 2019 साठी आमच्यासोबत सहभागी व्हा

ईशा योग केंद्र, कोयंबतूर, तामिळनाडू येथे
मोफत प्रवेश. सर्वांचे स्वागत आहे
सायंकाळी 6.50 – 8.30 (कृपया 6.40 पर्यन्त आसनस्थ व्हा)
अधिक महितीसाठी कृपया संपर्क साधा:
दूरध्वनी: 83000 83111 किंवा ईमेल: info@mahashivarathri.org

detail-seperator-icon

मागील यक्ष उत्सवातील कला सादरीकरणे

ईशा फाऊंडेशन प्रत्येक वर्षी यक्ष हा तीन दिवसांचा सांस्कृतिक नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम आयोजित करते.भारतीय पुराणातील प्रसिद्ध दैवी व्यक्तित्व ‘ यक्ष’ यांच्या नावाने फेब्रुवारी/ मार्च सादर केला जाणारा हा कार्यक्रम नामवंत कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मंच उपलब्ध करून देतो आणि विख्यात कलाकारांनी सादर केलेल्या या प्राचीन कलेच्या सादरीकरणाला प्रेक्षक उत्स्फूर्त दाद देतात.

Vidushi Bombay Jayashri – Carnatic Vocal

Shri Ganesh and Shri Kumaresh – Carnatic Violin

Padmashri Geeta Chandran – Bharatanatyam

Padma Bhushan TV Sankaranarayanan – Carnatic Vocal

Ustad Sayeeduddin Dagar – Hindustani Vocal

Malladi Brothers – Carnatic Vocal

Rajan Mishra and Sajan Mishra – Hindustani Vocal

Rama Vaidyanathan – Bharatanatyam

Pandit Ajoy Chakrabarty – Hindustani Vocal

Mysore Brothers – Carnatic Violin

Padmashri Meenakshi Chitharanjan – Bharatanatyam

Bijayini Satpathy and Surupa Sen – Odissi

detail-seperator-icon