Join Us And Watch Yaksha Live Performances

यक्ष 2021 च्या झलकी

श्री संदीप नारायण, कर्नाटक

हिंदुस्तानी, श्रीमती कौशिकी चक्रवर्ती

detail-seperator-icon

यक्ष – मंत्रमुग्ध संगीत आणि नृत्य कलेची एक उत्साही मैफिल

८, ९ आणि १० मार्च २०२१ (महाशिवरात्री आधीचे तीन दिवस) ईशा योग केंद्रात
हजारो वर्षांपासून विकसित झालेले भारतीय कलाप्रकार हे केवळ या देशाच्या संस्कृतीचे प्रतिबिंबच नव्हे, तर आध्यात्मिक प्रेरणेचा स्त्रोत आहेत. त्यांनी या देशातील कित्येक पिढ्यांना समृद्ध केले आहे परंतु आज मात्र आपल्याला त्यांचा विसर पडत चाललेला आहे. देशातील नृत्यकलेची विशिष्टता, शुद्धता आणि विविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी, ईशा फाऊंडेशन दरवर्षी 3 दिवस चालणार्‍या यक्ष या संस्कृतिक, संगीत आणि नृत्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करते. यामध्ये अनेक नामवंत कलाकार आपली कला सादर करतात. भारतीय पुराणकथांनुसार स्वर्गीय व्यक्ती असणार्‍या यक्षांचे नाव दिलेला हा कार्यक्रम अनेक नामवंत कलाकारांना या प्राचीन कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देतो.

detail-seperator-icon

२०२१ संगीत मैफली

यक्ष हा ईशा फाऊंडेशनद्वारे आयोजित केला जाणारा संगीत आणि नृत्याचा वार्षिक महोत्सव आहे. फेब्रुवारी/मार्च मध्ये साजरा केला जाणार्‍या यक्ष या कार्यक्रमात भारतातील अनेक नामवंत कलाकार सहभागी होतात आणि हजारो प्रेक्षक त्याकडे आकर्षित होतात.

शा फाऊंडेशन आपणास आमंत्रित करते ‘यक्ष’ उत्सवात. नामवंत कलाकारांचा सहभाग असणार्‍या तीन दिवसांच्या सांस्कृतिक, सांगीतिक आणि नृत्य सोहळ्यास.

पहिला दिवस – ८ मार्च २०२१

श्रीमती कौशिकी चक्रवर्ती

हिंदुस्तानी

श्रीमती कौशिकी चक्रवर्ती एक भारतीय शास्त्रीय गायिका आहेत. संगीत अनुसंधान अकादमीमध्ये प्राविण्य प्राप्त, त्या पटियाला घराण्याच्या प्रोत्साहिका आहेत आणि त्यांच्या शैलीत खयाल आणि अर्ध-शास्त्रीय ठुमरी सामील आहे. त्या एशिया-प्यासीफिक श्रेणीमध्ये विश्व संगीतसाठी 2005 बीबीसी रेडियोमध्ये 3 पुरस्कार विजेत्या आहेत.

दिवस दुसरा – ९ मार्च २०२१

श्री संदीप नारायण

कर्नाटक

संदीप नारायण आज कर्नाटक संगीत क्षेत्रातले एक नामवंत गायक बनले आहेत. ते एक असे पहिले संगीतकार आहेत, ज्यांचा जन्म अमेरिकेत झाला, पण स्वतःला पूर्णपणे कर्नाटक संगीत शिकण्यात समर्पित करण्यासाठी ते भारतात आले. संदीप गायन क्षेत्रातल्या नवनवीन सीमा पार करून अनेक महत्वाकांक्षी संगीतकारांसाठी प्रेरणास्रोत झाले आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार, आणि कला रत्न व युवा पुरंदर पुरस्कार सहित अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहेत.

दिवस तिसरा – १० मार्च २०२१

ईशा संस्कृती

भरतनाट्यम

ईशा संस्कृति ही सदगुरुंनी स्थापलेली मुलांमधील उपजत कला-कौशल्य बहरून-फुलून आणण्याच्या उद्देशाने निर्माण केलेली खास शिक्षण प्रणाली आहे. मुलांसाठी एक आदर्श आणि प्रेरक वातावरण निर्माण करते जेणेकरून मुलं त्यांच्या आत आणि त्यांच्या बाहेरील जगात सुसंगत आणि समरस होऊन घडू शकतील.

योगिक अभ्यास, भरतनाट्यम, शास्त्रीय संगीत आणि मार्शल आर्ट – कलरीपयट्टू, यासारख्या भारतीय शास्त्रीय कलांचे एक अद्वितीय मिश्रण मुलांच्या शरीरात आणि मनात समतोल आणि स्थैर्य बाणते. ह्या जटिल कलांचा उपयोग हजारो वर्षांपासून केला जात आहे – केवळ एक मनोरंजन किंवा छंद म्हणून नव्हे, तर एक आध्यात्मिक प्रक्रियेच्या रुपात. संस्कृत – जीचे आध्यात्मिक महत्व अनन्यसाधारण आहे आणि ही एक अद्वितीय भाषा आहे – म्हणून ही भाषा ह्या मुलांच्या शिक्षणाचा एक प्रमुख अंग आहे. यासोबत मुलं इथं इंग्रजी आणि मुलभूत गणित सुद्धा शिकतात.

detail-seperator-icon

यक्ष २०२० च्या झलकी

Hyderabad Brothers, Carnatic Classical Vocals

Kala Ramnath, Hindustani Classical Violin

यक्ष २०१९ च्या झलकी

Kalapini Komkali, Hindustani Vocal Performance