सहभागी व्हा
गेली अनेक वर्षे ईशा योग केंद्रामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरा केला जात आहे. संगीत, नृत्य यांचा समावेश असलेले संस्कृतिक कार्यक्रम आणि सद्गुरूंनी संचालित केलेले ध्यान यांचा समावेश असलेला हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी लक्षावधी लोकांना आकर्षित करून घेत आहे. त्याहीपेक्षा अधिक व्यक्ती या कार्यक्रमात ऑनलाइन स्वरुपात वेबस्ट्रीमद्वारे अथवा आमच्या मिडिया पार्टनरर्सच्या सहकार्याने टीव्हीवर थेट प्रक्षेपणाद्वारे सहभागी होतात.
महाशिवरात्री
१ मार्च २०२२ : सायं 6 – रात्रभर
सादरकर्ते – साऊंड्स ऑफ ईशा आणि इतर नामवंत कलाकार
स्थळ – ईशा योग केंद्र
पत्ता – ईशा योग केंद्र, वेल्लिंगीरी फूटहिल्स, कोयंबतूर, तमिळनाडू 641114
महाशिवरात्रीसाठी नोंदणी
वैयक्तिकपणे सहभागी होण्यासाठी
सर्वांचे सहर्ष स्वागत आहे!.
सामान्य चौकशी
फोन: 83000 83111
ईमेल: info@mahashivarathri.org
देशव्यापी टी.व्ही.वर थेट प्रक्षेपण:
Hindi
Tamil
सत्संग
ईशा योग केंद्रामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संपूर्ण भारतातून तसेच जगाच्या इतर भागांमधून लक्षावधी व्यक्ती या रात्रभर सुरू असणार्या अद्वितीय कार्यक्रमात आणि सद्गुरूंसोबत होणार्या सत्संगात सहभागी होतात.
ध्यान
संपूर्ण रात्रभर सदगुरूंदवारे संचालित ध्यान आयोजित केले जाते आणि त्यामध्ये रंगीबेरंगी संस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले असतात.
मध्य रात्रीचे ध्यान
मध्यरात्रीच्या ठोक्याला, सद्गुरु उपस्थित सर्व लोकांसोबत एक शक्तीशाली ध्यान करायला सुरुवात करतात आणि हे ध्यान ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असते.
शक्तिशाली मंत्र उद्घोष
साक्षात्कारी गुरूंच्या उपस्थितीमुळे एक साधा उद्घोष स्व-परिवर्तनाची शक्तीशाली प्रक्रिया बनतो. या महाशिवरात्रीला सद्गगुरूंच्या नेतृत्वाखाली होणार्या या मार्गदर्शित ध्यानासाठी आमच्यासोबत लाईव्ह वेबस्ट्रिमद्वारे सहभागी व्हा. अधिक माहिती
महाशिवरात्रीची तयारी करा – महाशिवरात्री साधना
महाशिवरात्री साधना ही महाशिवरात्रीची तयारी आहे – महाशिवरात्रीची रात्र अनेक प्रचंड शक्यता उपलब्ध करून देते. सात वर्षांपेक्षा अधिक वय असणारी कोणतीही व्यक्ती साधनेत सहभागी होऊ शकते. अधिक माहिती
आपल्या घरी महाशिवरात्र साजरी करा
मानवी शरीरातील ऊर्जेच्या नैसर्गिक प्रचंड प्रवाहामुळे शक्तीशाली साधना करणे कोणालाही शक्य होते, जी इतरवेळी करणे सहसा त्यांना जमत नाही, ज्यांनी आवश्यक अशी साधना केली नसेल.
बहुतांश व्यक्तींना माहिती आहे त्यानुसार सर्वसाधारण परिस्थितीत आम्ही लोकांना नेहेमीच “ओम नमः शिवाय” या मंत्राचा घोष करू नये असे सूचित करतो. परंतु महाशिवरात्रीला मात्र कोणतीही व्यक्ती ही साधना करून त्याचे लाभ मिळवू शकते.
महाशिवरात्रीला ज्यांना ईशा योग केंद्रात येणे शक्य होणार नाही, त्यांनी या रात्रीचा उपयोग खाली नमूद केल्यानुसार करून घ्यावा.
- अजिबात न झोपता संपूर्ण रात्रभर जागे राहणे, सजग असणे आणि पाठीचा कणा न झोपता, उभ्या स्थितीत असणे अतिशय लाभदायक आहे.
- आपण आपल्या खोलीत दिवा किंवा लिंग ज्योत लावून आणि ध्यानलिंगाची किंवा सद्गुरूंची प्रतिमा, फुले, सुगंधी उदबत्त्या इत्यादि समोर ठेऊन आपली खोली सुसज्ज करू शकता.
- आपण मंत्रोच्चार करू शकता, भक्तीगीते आणि मंत्र गाऊ किंवा ऐकू शकता.
- आपण जर एकटे असाल, तर निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारून येणे चांगले. आपण जर समूहात असाल तर ह्या दिवशी शक्य तितके न बोलता, शांत असणे अधिक उत्तम.
- मध्यरात्रीची साधना खाली नमूद केल्यानुसार करता येईल: मध्यरात्री 11:10 ते 11:30 – Nadi Shuddhi; 11:30 ते 11:50 – ओमकार उद्घोष; 11:50 ते 12:10 – “ओम नमः शिवाय” या महामंत्राचा उद्घोष.”
- आपण जर थेट प्रक्षेपणाद्वारे आणि वेबकास्टद्वारे उत्सव पाहत असाल, तर आपण तेथे दिलेल्या ध्यान सूचनांचे पालन करावे.