महाशिवरात्री
February 21st, 2020 – 6pm – 6am
ईशा योगा सेंटर
“ह्या महाशिवरात्रीला , वेल्लिंगीरी पर्वताच्या पायथ्याशी, तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी आहात. जर तुम्ही स्वतःला ग्रहणशील ठेवलंत, तर ही तुमच्यासाठी एका दिव्य जागृतीची रात्र होऊ शकते.” -सदगुरू
रात्रभर चालणाऱ्या उत्सवाची वैशिष्ठ्ये:
मध्य रात्रीचे ध्यान
मध्यरात्रीच्या ठोक्याला, सद्गुरु उपस्थित सर्व लोकांसोबत एक शक्तीशाली ध्यान करायला सुरुवात करतात आणि हे ध्यान ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असते.
संगीत मैफली
प्रत्येक वर्षी ईशा योगा केंद्रामध्ये महाशिवरात्री मोठ्या दिमाखात साजरी केली जाते. या अद्भुत रात्रीत सहभागी होऊन तिचा पूर्ण लाभ सर्वांना मिळण्यासाठी, जगभरातल्या प्रख्यात कलाकारांच्या संगीत मैफिली आणि नृत्याचे आयोजन केले जाते.
रुद्राक्ष प्रसाद
महाशिवरात्रीच्या दिवशी ईशा योग केंद्रात उपस्थित सर्व भाविकांना प्रसाद म्हणून रुद्राक्षचा मणी मिळेल. हा मणी गेल्या वर्षभरात आदियोगींना अर्पण केल्या गेलेल्या एक लाख आठ रुद्राक्ष मण्यांपैकी एक आहे.
सर्प सूत्र
ह्या महाशिवरात्री उत्सवाला ईशा योगा सेंटर मध्ये उपस्थित साधकांना सर्प सूत्र दिले जाईल. तांब्यापासून तयार केलेले हे सर्प सूत्र डाव्या हाताच्या अनामिकेत घालावे जे स्थैर्य आणि संपन्नतेसाठी सहायक आहे.
भैरवी महा यात्रा
महाशिवरात्रीला लिंग भैरवी देवीच्या उत्सव मूर्तीची तिच्या मंदिरापासून आदियोगीपर्यंत एक भव्य उत्सव यात्रा निघणार आहे. भाविकांना पहिल्यांदाच या महायात्रेत भाग घेण्याची संधी लाभणार आहे. देवीची महिमा अनुभवा आणि तिच्या कृपेत न्हावून जा!
आदियोगी प्रदक्षिणा
प्रदक्षिणा ही ऊर्जेचा स्त्रोतामधून शक्ती प्राप्त करण्यासाठी तिच्या भोवती गोल फिरण्याची क्रिया आहे. आदियोगी प्रदक्षिणेद्वारे कोणतीही व्यक्ती आदियोगींची कृपा ग्रहण करू शकते. ह्या प्रदक्षिणेद्वारे अंतिम मुक्ती प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना आवश्यक अशी सहायक ऊर्जा लाभते.
ईशा योगा केंद्रामध्ये महाशिवरात्री उत्सवात सर्वाना मोफत प्रवेश आहे. या उत्सवासाठी स्वेच्छेने तुम्ही दिलेले दान ह्या विलक्षण रात्रीच्या संभावना जगभरातील लाखो लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी सहायक ठरेल.
सहायक प्रश्नोत्तरे
माहितीसाठी संपर्क:
फोन: 83000 83111
इमेल: info@mahashivarathri.org