स्थळ – ईशा योग केंद्र
कोयंबतूरच्या बाहेर वेल्लिंगीरी पर्वत पायथ्याशी वसलेले ईशा योग केंद्र हे ईशा फाऊंडेशनचे प्रमुख कार्यालय आणि केंद्र आहे. स्वतःचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी ईशा हे एक अतिशय पवित्र स्थळ आहे, ज्या ठिकाणी आपण आपल्या आंतरिक उन्नतीसाठी वेळ व्यतीत करू शकता. या केंद्रात योगाचे चारही महत्वाचे मार्ग दाखविले जातात – क्रिया (ऊर्जा), ज्ञान, कर्म आणि भक्ती. जगभरातील लोकं या ठिकाणी भेट देतात.
ध्यानलिंग हा ईशा योग केंद्राचा केंद्रबिन्दु आहे, एक शक्तीशाली आणि अद्वितीय ऊर्जा स्त्रोत, ज्यामधून प्रत्येक मनुष्याला त्याचे जीवन संपूर्णतः अनुभवायची संधी प्राप्त होते. ईशा योग केंद्राच्या शेजारी लिंग भैरवी आहे – दैवी स्त्रीशक्तीचे एकाच वेळेस भयंकर आणि कोमल स्वरूप.
या केंद्रात निवासाच्या विविध सुविधा तसेच विविध कालावधीचे योग कार्यक्रम उपलब्ध असून याचा वापर आपण करून घेऊ शकता. कार्यक्रमात सहभागी होणार्या व्यक्ती तसेच पाहुणे या दोघांसाठी त्यांच्या निवासाचा एक भाग म्हणून सात्विक भोजन दिले जाते. ईशा योग केंद्र आपल्याला अधिक आरोग्यदायी जीवनशैलीकडे घेऊन जाण्यासाठी, स्व-पूर्ततेची उच्च पातळी गाठण्यासाठी तसेच स्वतःची संपूर्ण क्षमता जाणून घेण्यासाठी सहायक वातावरण उपलब्ध करून देते.
महाशिवरात्रीसाठी नोंदणी
यक्ष आणि महाशिवरात्रीसंबंधी सर्वसाधारण चौकशी:
ईमेल : info@mahashivarathri.org
ऑफलाइन:
महाशिवरात्रीसाठी सर्वसाधारण चौकशी आणि नोंदणी:
दूरध्वनी: 83000 83111
योगा केंद्रापर्यंत कसे पोहोचायचे
योग केंद्र हे कोइंबतुर शहराच्या पश्चिमेकडे 30 किलोमीटर अंतरावर वेलियांगिरी पर्वताच्या पायथाशी वसलेले आहे. दक्षिण भारतातील एक प्रमुख औद्योगिक शहर असलेले कोइंबतूर हे शहर हवाई, रेल्वे आणि रस्त्याने चांगले जोडलेले आहे. चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि बंगलोर या शहरांमधून विमानांची नियमित सेवा उपलब्ध आहे. भारतातील सर्व प्रमुख शहरांमधून रेल्वेसेवा उपलब्ध आहे. कोइंबतूरपासून इशा योग केंद्रात येण्यासाठी नियमित बस आणि टॅक्सी सेवासुद्धा उपलब्ध आहे.
तेथपर्यन्त कसे पोहोचायचे
ध्यानलिंग हे कोइंबतुर शहराच्या पश्चिमेकडे 30 किलोमीटर अंतरावर वेलियांगिरी पर्वताच्या पायथाशी वसलेल्या इशा योग केंद्रामध्ये आहे. दक्षिण भारतातील एक प्रमुख औद्योगिक शहर असलेले कोइंबतूर हे शहर हवाई, रेल्वे आणि रस्त्याने चांगले जोडलेले आहे.
हवाईमार्ग:
कोइंबतुर शहरमध्ये विमानतळ असून चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि बंगलोर यासारख्या प्रमुख शहरांमधून येथे येण्यासाठी विमानांची नियमित सेवा उपलब्ध आहेरेल्वे:
रेल:
सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक कोइंबतूर असून ते इशा योग केंद्रापासून 30 किलोमीटर दूर आहे.
रस्ते:
पूंडी, सेम्मेडू किंवा सिरूवनीकडे जाणारे सर्व प्रमख मार्ग इशा योग केंद्राकडे जातात. रेल्वे स्थानक आणि विमानतळाच्या बाहेर टॅक्सी उपलब्ध आहेत.
थेट बस:
कोइंबतूर ते इशा योग केंद्र या मार्गावर रोज बससेवा उपलब्ध आहे.
बसचे वेळापत्रक पहा
वाहनांसाठी मार्गदर्शन
कोइंबतूरमधून उक्कडममार्गे पेरूर/सिरूवनीकडे जाणारा रस्ता घ्या. अलनदुराईच्या पुढे आल्यावर इरुटूपल्लम जंक्शनला उजवीकडे वळा. इरुटूपल्लम जंक्शनपासून इशा योग केंद्र 8 किलोमीटर, आणि पूंडी मंदिराच्या अलीकडे त्याच रस्त्यावर साधारण 2 किलोमीटर अंतरावर आहे. मार्गावर सर्वत्र ध्यानलिंगाचे दिशादर्शक फलक लावलेले आहेतen route.
संपर्क तपशील
दूरध्वनी: 83000 83111
ईमेल: info@mahashivarathri.org