उत्सव कार्यक्रमाचे वेळापत्रक

महाशिवरात्री हा हर्षोल्हासाचा रात्रभर चालणारा उत्सव आहे, ज्यात सामील आहे सद्गुरुंसोबतचे शक्तिशाली मध्यरात्रीचे ध्यान, आणि मंत्रमुग्ध करणारी नामवंत कलाकारांची सांस्कृतिक आणि संगीत मैफिली. ह्या वर्षीच्या उत्सवात सहभागी व्हा ऑनलाइन आणि सोहळ्याची मौज लुटा.

महाशिवरात्रीच्या पवित्र रात्रीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी, आपण सुर्यास्तापासून सुर्योदयापर्यंत, तुमचा पाठीचा कणा ताठ आणि सरळ ठेवून रात्रभर जागरण करणे अतिशय लाभदायक आहे.

उत्सव सोहळ्याचे वेळापत्रक

6:10 pm

पंचभूत क्रिया

शरीर यंत्रणेतील पंचतत्वांच्या शुद्धीकरणासाठीची एक शक्तिशाली क्रिया

6:40 pm

लिंगभैरवी महाआरती

लिंगभैरवी देवी उत्सव मूर्तीची उत्साही आणि जल्लोषात निघणारी मिरवणूक आणि देवीच्या कृपावर्षावात चिंब भिजण्याची संधी.

10:50 pm

सद्गुरुंचे मध्यरात्रीचे ध्यान आणि सत्संग

सद्गुरुंच्या सत्संगानंतर मध्यरात्रीच्या ध्यानाला सुरुवात होईल, जेव्हा सद्गुरू उत्सवात भाग घेणाऱ्या जगभरातील सर्व भाविकांना एका शक्तिशाली ध्यानधारणेत दीक्षित करतात, जे ह्या उत्सवाचे एक प्रमुख आकर्षण आहे, ज्याची लोक फार उत्सुकतेने वाट पाहतात.

12:15 am

आदियोगी दिव्य दर्शन

एक रोमांचक आणि अदभूत असा प्रकाश आणि ध्वनीचा थ्री डी शो जो दर्शवतो आदियोगीचे मानवतेप्रतीचे त्यांनी केलेले अमूल्य योगदान आणि अर्पण.

12:30 am to 2:15 am

सद्गुरुंचा सत्संग आणि साधकांच्या प्रश्नोत्तरी आणि शंभो मेडीटेशन

शंभो हा शिवशंकराचे एक सौम्य आणि मृदू रूप आहे. आणि “शंभो” मंत्र तुमच्या आत एक नवीन आयाम खुला करण्याची शक्यता प्रदान करतो.

3:35 am

ब्रम्हमुहूर्त मंत्रघोष

ब्रम्हमुहूर्त, रात्रीच्या शेवटच्या प्रहराची ही वेळ, आध्यात्मिक साधना करण्यासाठी अतिशय उपयुक्त वेळ आहे, जर तुम्हाला तुमच्या भौतिक स्वरूपापलीकडे जाण्याची इच्छा असेल तर.

मंत्रमुग्ध करणाऱ्या, रात्रभर चालणाऱ्या संगीत आणि कला मैफिली

प्रख्यात कलाकारांच्या संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक मैफिली तुम्हाला रात्रभर उत्साही, जागे आणि जागृत ठेवतील जेणेकरून आपण ह्या मंगलमय रात्रीच्या शक्यतांचा लाभ घेऊ शकाल.

detail-seperator-icon