Maha Annadanam

लाखो भाविकांना अन्नदान करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा!

 

इतिहासाची नोंद होण्याच्या कितीतरी आधी, जगभरातील लोकांनी अन्न आणि जीवन यांच्यामधील घनिष्ट संबंध
ओळखलेला आहे. अन्नदानम या संस्कृत शब्दाचा अर्थ अन्नाचे दान किंवा वाटप असा आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये, अन्नाचे वाटप हे नेहेमीच एक पवित्र कर्तव्य मानले गेले आहे. भारतीय उपखंडातील प्रत्येक
समाजात, अन्नदानाशिवाय, किंवा प्रसाद – पूजेच्या दरम्यान अर्पण केले जाणारे खाण्याचे पदार्थ, याचे वाटप
केल्याशिवाय कोणताही उत्सव किंवा कार्यक्रम पूर्ण होत नाही.

आपण आपले पूर्वज, देवता, सन्यासी, वडीलधार्‍या व्यक्ती, यात्रेकरू तसेच आपले कुटुंबीय, मित्रमंडळी, अतिथी,
आणि प्राण्यांसाहित जो कोणी भुकेलेला असेल त्याला अन्न देऊ करतो.

या वैश्विक परंपरेमुळे, मागील हजारो वर्षे आधी, योगी, संत आणि महात्मे देशाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत
अध्यात्मिक विज्ञानाचा प्रसार संपूर्ण उपखंडमध्ये करू शकले आहेत.

संपूर्ण रात्रभर सुरू असणार्‍या या महाशिवरात्री उत्सवात, ईशा योग केंद्रात; या उत्सवासाठी उपस्थित असणार्‍या
लाखो भाविकांना अन्नदान केले जाते. ईशा फाऊंडेशन आपणास अन्नदानात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून
देत आहे.