शिवांग साधना हे सद्गुरूंनी पुरुषांसाठी प्रदान केलेलं एक व्रत आहे. ही साधना ध्यानलिंगाची ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता वाढवून शरीर, मन आणि ऊर्जेच्या अधिकाधिक गहन स्तरांचा ठाव घेण्यासाठी तुम्हाला सक्षम करते.
ही साधना तुमच्यातील भक्तीची भावाना अभिव्यक्त होऊ देण्यासाठीची एक संधी आहे. ‘शिवांग’ चा शब्दश: अर्थ ‘शिवाचे अंग’ असा आहे आणि शिवांग साधना ही सृष्टीच्या स्त्रोताशी असलेल्या आपल्या नात्याला आपल्या जाणिवेमध्ये आणण्याची संधी आहे. ही साधना पवित्र वेल्लियंगिरी पर्वताची यात्रा करण्याची आणि शिव-नमस्कार या शक्तीशाली साधनेची दीक्षा घेण्याची सुद्धा संधी आहे.