About
Wisdom
FILTERS:
SORT BY:
जर तुम्ही जागरूक प्रतिसाद देण्याच्या अवस्थेत असलात, तर कुठलीच समस्या अडथळा ठरणार नाही,
जीवनाच्या पुनरावृत्तीमध्ये सुरक्षितता आहे, पण कुठल्याही शक्यता नाही, कुठलीच वाढ नाही.
जर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचे आवरण तोडले, तर तुम्ही एक सहज उपस्थिती म्हणून राहाल - अगदी जीवनासारखे, देवासारखे, केवळ एक उपस्थिती.
भ्रमनिरास होणं म्हणजे काही वाईट गोष्ट नाही, कारण जर तुमचे सर्व भ्रम मोडून पडले, तर याचा अर्थ तुम्ही वास्तवाच्या अधिक जवळ जात आहात.
जर तुमच्या सर्व उर्जा एका दिशेला केंद्रित असल्या, तर आत्मसाक्षात्कार काही दूर नाही. शेवटी तुम्ही जे शोधत आहात, ते तुमच्या आताच उपस्थित आहे.
जर तुम्हाला निरोगी आणि स्वस्थ बनायचं असेल, तर पाहिलं पाऊल म्हणजे तुमच्या यंत्रणेसोबत काय घडत आहे याकडे लक्ष देणं.
ध्यानालिंग एका जिवंत गुरू सारखे आहे. गुरूची मुख्य भुमिका ही तुम्हाला शिकवण आणि मार्गदर्शन देणे नाही, तर तुमच्या उर्जा प्रज्वलित करणे आहे.
This is the most important aspect of Yoga: an absolute experience of the inclusiveness and immensity of all life. Save Soil.
एकदा का तुम्ही आणि तुमच्या शरीरामध्ये, तुम्ही आणि तुमच्या मनामध्ये अंतर निर्माण झाले, की मग हा दुःखाचा अंत आहे.
इतर कुणाला शिक्षा द्यायचा नादात, तुम्ही स्वतःलाच शिक्षा देत असता.
तुमच्या ज्या काही क्षमता असतील, तुम्ही त्यांना अगदी कमाल मर्यादेपर्यंत आणि त्याहून थोडं अधिक ताणलं पाहिजे.
मुळात, तुम्ही जीवन आहात. जर जीवन तुमच्या आत अगदी अप्रतिमरित्या घडत असेल - तर हेच सर्वांत मोठे यश आहे.