पहिला प्रश्न दिल्लीवरुन विक्रमचा आहे. विक्रम… विक्रम म्हणतो हे कावेरी कॉलिंग बद्दल आहे. “ही सरकारची जबाबदारी असायला हवी ना? मी ह्यासाठी ४२ रुपये का देऊ, जेव्हा की मी आधीच टॅक्स भरतोय? मी तर चेन्नईच्या जवळपास ही राहत नाही.”
तुम्ही हा विचार करताय, “मी चाळीस किंवा बेचाळीस रुपये का देऊ? “ नका देऊ. जर तुम्ही… जर तुमचं हृदय पाषाणाच आहे तर नका देऊ. त्याची गरज नाहिये. आम्ही ते करु. आम्ही करु. ह्या देशात, आणी जगात अजूनही खुप माणसं जिवंत आहेत. लोक योगदान देताहेत. फक्त भारतातुनच नाही तर संपुर्ण जगातुन. लोकं हातभार लावताहेत,   कारण जगात माणुसकी अजुनही जिवंत आहे.

#SadhguruMarathi

Transcript - तर हे अस घडल, शंकरन पिल्ले ने एका चेन्नईच्या हॉटेल मध्ये प्रवेश घेतला. रात्रीच्या ११.३० वाजता तो रिसेप्शनला कॉल करुन ओरडला, “मी या खोलीत फसलो आहे. कुणीतरी माझी मदत करा, काय चाललय हे?” रेसेप्शनीस्ट ने विचारल, “तुम्ही फसलाय याचा अर्थ काय? ती तुमचीच खोली आहे ना?” तो म्हणाला, “हो.”  “मग फसल्याचा अर्थ काय आहे नेमका?”  “मला तीन दारे दिसताहेत. जर मी एक… जर मी एक उघडल, तर ते बाथरुम आहे. जर मी दुसरा उघडला तर तिथे अडगळ आहे. आणी तिसऱ्यावर लिहलय ’ ‘Do Not Disturb.’ मी अडकलोय. ही ती टाळी आहे जी मी आत्ता ऎकली. हाच सापळा आहे. हा लोकशाही देश आहे. याचा अर्थ हा आपला देश आहे. मी माझ मत देतो, मला हे माहित नाहिये की विक्रम ने आपल मत दिल की नाही, कदाचित त्या दिवशी तो पिकनीक ला गेला असेल, किंवा त्याने मत दिल असेल. मी मतदान केल.  तुम्हीही करा. मला खात्री आहे जर तो इंजीनियरींग चा विद्यार्थी असेल, तर त्याने अजुन कुठलाही कर भरला नसेल, आणी तो म्हणतोय की तो कर भरतोय. माझी इच्छा आहे की तुम्ही हे समजुन घ्याव – ह्या देशात जवळपास फक्त ३.२% लोकच टॅक्स भरतात, इन्कमटॅक्स. तुम्हाला हे माहित आहे? जवळपास फक्त ३.२% लोक टॅक्स भरतात. उरलेल्या ९६% चा भार कोण वाहतय? कारण ९६% लोकं कर सीमेच्या खाली आहेत, किंवा ते टॅक्सची चोरी करतात- ह्यापैकी एक. जर तुम्ही टॅक्सची चोरी करणाऱ्यांची मोजणी केलीत तर ते आणखीन ३ ते ४% ची भर घालतील. उरलेले ९०% लोक करसीमेच्या खाली आहेत.
जेव्हा तुमच्याकडे एक देश ह्या स्थितीत आहे जिथे ९०% लोक कर भरण्यास पात्रच नाहियेत, तुम्हाला वाटत की सर्वकाही सरकार करु शकत? तुम्ही काय…तुम्हाला… तुम्हाला काय वाटत ते किती कर वसुली करतात? ते तुम्हाला ४०% कर आकारत असतील. पण तुम्हाला काय वाटत, १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशातुन त्यांना येणारा टॅक्स किती आहे? आणि त्यातुन त्यांनी सर्वकाही कराव अशी तुमची अपेक्षा आहे. मी सरकारची बाजु घेत नाहिये, मला वाटत की सरकारने शेतकऱ्यांना सबसीडी द्यावी. जे ते करताहेत. तुम्हाला वाटत की ह्या देशाप्रती तुमची काहीच जबाबदारी नाहिये. तुम्हाला वाटत की जे मुठभर लोक निवडुन आलेत, ते सर्वकाही करतील. नाही. हे अस होतय, हे.. होतय कारण तुम्हाला वाटत ते भ्रष्ट आहेत. हो ते आहेत. कारण ते तुमचेच प्रतिनिधी आहेत. जेव्हा मी तुम्हाला हे सांगतोय की ३लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय आणी तुम्ही म्हणता ”दुसऱ्या कुणाला तरी हे काम करु दे!” मला वाटत की तुम्ही भ्रष्ट आहात. हॅलो? जेव्हा तुम्ही तुमच्यातली माणुसकी टाकलीय, तर मला वाटत तुम्हीसुद्धा भ्रष्ट आहात. भ्रष्टाचार म्हणजे फक्त लाच घेण नाही. तुम्ही तुमच्या माणूसकीचा त्याग केलाय. म्हणजे तुम्ही भ्रष्ट आहात.
आज आपल्या देशातील सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रामाणीकतेची कमतरता आहे. फक्त राजकारण्यांमध्येच नाही, फक्त मोठया पदांवर विराजमान असलेल्या लोकांतच नाही, सामान्य जनता ही भ्रष्ट आहे. जर जनता भ्रष्ट नसती, तर राजकारण्याना भ्रष्टाचार करण खुप जड गेल असत. कारण दोन दिवसांपुर्वी तो तुमच्यातलाच एक होता. तो बस आत्ताच निवडून आलाय. तो निवडून आल्या क्षणी, त्याचा आख्खा वंश बोलायला लागतो मामा? “ तुम्ही मिनिस्टर बनलात, तुम्ही मला काय देणार आहात?” ते जाऊन विचारतात की नाही? हॅलो? जर तो नाही देत, “ मामा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. तुम्ही आपल्या कुटुंबाला का पाठिंबा देत नाही.?” ते विचारतात की नाही? तर भ्रष्टाचार फक्त एका जागी नाहिये, त्याने संपुर्ण देश व्यापलाय. मी तुम्हाला एक सांगतो, काही वर्षांपुर्वी, जवळपास २५ वर्षांपुर्वी मी त्रिची ला होतो, एका हायस्कुलमध्ये १४ वर्षांच्या मुलांशी बोलत होतो. 
मी त्यांना विचारल, “ठीकाय, शिक्षणानंतर काय कराव अशी तुझी इच्छा आहे?” एक मुलगा म्हणाला, “ मला आर टी ओ बनायचय.” १४ वर्षांचा मुलगा. मग मी म्हणालो, “ तुला का.. रोड ट्रानस्पोर्ट सिस्टम मध्ये रुची आहे.? तुला काहीतरी करायचय, तुझी रुची कशात आहे?” तो म्हणाला, “ मला भरपूर लाच मिळेल.” मला वाटल ही ह्या देशाची शोकांतिका आहे. एक चौदा वर्षांचा मुलगा अजुन काहि अर्थाने लहान आहे. तो फक्त हा विचार करतोय की कस त्याला सर्वात जास्त लाच घेता येईल. – चौदा वर्षांचा मुलगा. तर, असा विचार करु नका की भ्रष्टाचार एकाच ठीकाणी आहे. भ्रष्टाचार सगळीकडे आहे. आपण ह्याला आपली संस्कृती बनवुन टाकलीय. तरूणांना हे बदलाव लागणार, ह्या देशाला एक कायदे पाळणारा देश बनवण खुप जास्त महत्वाच आहे. हे महत्वाच आहे की तुम्ही नियम पाळावेत, सोयिस्कर असो किंवा गैरसोईच, नियम पाळले गेले पाहिजेत. हे महत्वाच आहे. तुम्हाला ही संकृती बनवावी लागेल. तर मूळ प्रश्न, हे मी का कराव? 
तर, जर तुम्ही एक मनुष्य आहात. तर तुम्ही हे करायला हव. जर तुम्ही दुसरे काही आहात, तर मी हे तुमच्यावर सोडतो, कारण ही एक अशी आपत्ती आहे जी फक्त सरकार हाताळू शकत नाही, हे त्यांच्या आवाक्या बाहेर आहे. हे त्यांच्याच्या खुप पलिकडचे आहे. पण सरकार.. तुम्हाला हे समजायला हव की हे करण सोप नाहिये. आम्ही दोन्ही सरकारांवर सतत दबाव आणतोय आणी सुदैवानं काल कावेरी कॉलिंगसाठी एक खुप चांगला दिवस होता, कारण दोन्ही सरकारांनी, आवश्यक ती सबसीडी देण्याचे मान्य केले. ह्याने त्यांना दरवर्षी काही हजार कोटींचा खर्च होईल, पण ते हे करायला तयार आहेत.