प्रश्नकर्ता: सद्गुरु, नमस्कार. मला शेकडो प्रश्न विचारायचे आहेतसद्गुरु: ओहो!प्रश्नकर्ता: तरी मी फक्त एकच प्रश्न विचारतो. मला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही शिकवत असलेला हठयोग, शांभवी आणि शक्ती चालना, आणि सम्यामा साधना – जर एखाद्याने संपूर्ण एकाग्रतेने यांचा अभ्यास आणि सराव केला, तर मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील का? सद्गुरु: नाही, तुमच्या कोणत्याच प्रश्नाच उत्तर मिळणार नाही. मी पुष्कळ लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देतो आहे, जे कुठल्याच प्रकारची साधना करत नाहीत. जे लोक दररोज, एकाग्रतेने साधना करत आहेत त्यांचे प्रश्न घेतो आहे का किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तर देत आहे का? नाही. कारण साधन करण्यामागचा उद्देश्य हा आहे, की त्यामुळे सर्व प्रश्नच जळून जातील, त्यांची उत्तरे तुम्हाला मिळतील अस नाहीये. जर तुमचे प्रश्नच नाहीसे झाले, तर उत्तरांना काय अर्थ आहे? जे लोक स्वतःच्या आंतरिक कल्याणासाठी काहीही करत नाहीयेत पण फक्त प्रश्न विचारून आणि उत्तर ऐकून असा विचार करतात, कि यामुळे त्यांचे आयुष्य व्यवस्थित चालेल, सध्या अशा लोकांचे आम्ही मनोरंजन करत आहोत. पण एक वेळ अशी येईल, मी हे सगळं थांबणार आहे पण सध्या मात्र ते चालू आहे. एक वेळ अशी येईल, तेव्हा मी फक्त अशा लोकांसाठी उपलब्ध असेन जे त्यांची साधना अतिशय तीव्रतेने करत आहेत. इतर लोकानी यूट्यूब ऐकाव. कारण असे आहे, की जुने चित्रपट नेहेमीच मनोरंजक असतात. कारण तुम्ही हे समजावून घेणे आवश्यक आहे – तुमचे प्रश्न मनाच्या ज्या कप्प्यातून येत आहेत त्याला हे कधीच उलगडणार नाही. मनाच्या ज्या आयामातून तुम्ही प्रश्न विचारताय, ते काहीही जाणून घेण्यास समर्थ नाही. त्याला फक्त निष्कर्ष हवे आहेत. मी काही तुम्हाला निष्कर्षांपत पोचवणारा नाहीये – मी एक प्रक्रिया आहे. मुक्तीचं शिखर सर करण्यासाठी जर तुम्ही राजी आहात, तर मी तुमच्यासाठी सदैव तयार आहे. तुम्हाला जर निष्कर्ष हवा असेल, तर मी तुम्हाला हताश करेन. कारण निष्कर्षाचा उपयोग काय? ही एक अखंडपणे चालू असणारी प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया इतकी सुंदर आणि विलक्षण बनते की मग तुम्ही निष्कर्षांची काही पर्वाच करत नाही. आणि मग तुमच्यात कोणतेच प्रश्न उरणार नाहीत. म्हणून मी जर सगळ्या साधना केल्या– तुम्ही अस बोलताय की ही जणू काही छळवणूकीची प्रक्रिया आहे – की जर मी हे सर्वकाही केल, तर माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का.