भैरवीच्या कृपेला जो पात्र होतो, त्याला न जीवन मरणाची  भीती, न दारिद्र्य किंवा अपयशाची चिंता.  जर केवळ तो भैरवीच्या कृपेला पात्र ठरला; तर जीवन कल्याणासाठी जे जे काही इच्छीतो ते ते त्याला प्राप्त होईल. - सद्गुरू 

लिंग भैरवी देवी ही दैवी मातेचे साकार रूप आहे – ती विश्वाच्या सृजन आणि पोषण करणाऱ्या पैलूंचं प्रती आहे. ती सर्वांना आपणात सामावून घेणारी आहे.  भक्ताची इच्छा जीवनाचे भौतिक आणि सांसारिक पैलू भोगण्याची असो किंवा त्यापलीकडे जाण्याची असो– देवी या सर्वांची सदैव दात्रीआहे.

सद्गुरूंनी लिंग भैरवीची अनेक रूपं निर्माण केली आहेत जेणेकरूनतुम्ही तुमच्या घरात प्राणप्रतिष्ठित स्थान निर्माण करू शकता. पारंपारिक दृष्ट्या,एक विशिष्ठ प्रकारचा लाभ मिळविण्यासाठी अशा यंत्राची रचना आणि निर्मिती केली जाते. लिंग भैरवी हे असं यंत्र आहे जे तुमच्या सर्वांगीण कल्याणासाठी योग्य वातावरण निर्माण करतं. या उर्जेप्रती तुम्ही  जर गृहणशील असलात तर आरोग्य,समृद्धी आणि आनंद हे स्वाभाविक परिणाम असतील. 
जेव्हा तुम्हाला हे यंत्र दिलं जातं,तेव्हा सद्गुरू तुम्हांला एका प्रक्रियेची दीक्षा देतात ज्याद्वारे तुम्ही देवीच्या ऊर्जेशी जोडले जाता.  त्यानंतर ते यंत्र तुमचं वैयक्तिक यंत्र होतं आणि त्याप्राणप्रतिष्ठित रुपाला रोजस्पर्श केल्यानं, देवीची कृपा तुमच्या आतून कार्य करू लागते. हे यंत्र तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येठेवल्यानं, तुमचा व्यवसाय सुरळीत चालण्यास आणि त्याची परिपूर्ण प्रगती होण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होतं.