काशी सर्वात पवित्र शहर आहे, ज्ञानार्जनाचे सर्वात पुरातन शहरांपैकी एक. हे एक असं स्थान होतं जिथे एकेकाळी शेकडॊ आत्मज्ञानी लोक राहत होते. तुम्ही चालणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला एक आत्मज्ञानी पुरुष भेटणार. म्हणून, ह्या संस्कृतीत ही एक परंपराच झाली की जर तुम्हाला मरायच आहे तर काशीमध्ये येऊन मरावं. जर तुम्ही काशीत मेलात, तर तुमची मुक्ती निश्चित आहे कारण इथे इतके सारे आत्मज्ञानी लोक आहेत. ….. दररोज ते गंगेत स्नान करायला येतात, तुम्हाला फक्त त्यांना एक नजर पहायच आहे, आणी जेव्हा त्यांना दिसेल की तुमची वेळ जवळ आलीय, नक्कीच ते तुमची मदत करणार आणी तुमच काम झाल. तर आज ही हा विश्वास दृढ आहे की जेव्हा तुम्ही वयोवृद्ध होता लोकं काशीकडे प्रयाण करतात आणी तिथे मरण्य़ाची वाट पाहतात. ही परंपरा ह्यासाठीच सुरु झाली कारण पिढ्यानपिढ्या, काशीमध्ये शेकडो आत्मज्ञान पुरुषांना जाताना पाहिल, आणी ती ज्ञानाचा सर्वात मोठा गाभा बनली.