सद्गुरू ह्या व्हिडीयोत नवरात्री उत्सवाचे आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्व स्पष्ट करत सृष्टी निर्मितीसाठी स्त्री तत्वाचे योगदान आणि दैवी मातेचे त्रिविध गुण उलगडून सांगताहेत.

ही नवरात्रीची पहिली रात्र आहे.
आणि ही रात्र...आणि हा दिवस...
हा येणारा उद्याचा दिवस...
हे ईश्वराच्या स्त्री-तत्वाला समर्पित केले गेलेले आहेत.
दुर्गा, लक्ष्मी, आणि सरस्वती…
ही स्त्री-तत्वाच्या तीन वेगवेगळ्या आयामांची प्रतीकचिन्हे म्हणून वापरली जातात.
त्या, अस्तित्वाच्या तीन मूळ गुणांना देखील दर्शवतात… तमस...रजस...आणि सत्व.
‘तमस’ चा शब्दश: अर्थ आहे – “जडत्व”, “रजस म्हणजे गतिशीलता किंवा भावनिक तीव्रता
सत्व…म्हणजे एक प्रकारे,
मानवी सीमा ओलांडून पल्याड जाणे.
विलीन होणे, विरून जाणे, एकरूप होणे.
अवकाशातल्या तीन वस्तुंशी मानवी शरीराची संरचना खूप खोलवर जुळलेली आहे - पृथ्वी, सूर्य आणि चंद्र.
त्यापैकी, पृथ्वी…. धरतीमातेला तमस मानलं गेलय.
सूर्याला रजस!
आणि चंद्राला सत्व मानल गेलय.