जेव्हा तुम्ही तीन, चार, पाच वर्षांचे होता, तेव्हा नव्हते का तुम्हाला बॉयफ्रेंडस् अन गर्लफ्रेंडस्? होते ना?.
आता तुम्ही त्या साध्या मैत्रीला नवे अर्थ देताय.
तर, मैत्रीचा अर्थ असा नाही की तुमच्यात शारीरिक संबंध असलाच पाहिजे. हॅलो?
हे तुम्ही अश्या काही समाजांमधून उचललंय जिथे शरीर हेच सर्वकाही आहे.
हे आजकाल असं झालं आहे ते कशामुळं?
हे फक्त अमेरिकेत होतं , पण आता हे सगळीकडेच आहे.
तुम्ही ”रिलेशनशिप” म्हटला, की लोक ती शारीरिक असल्याचं गृहीत धरतात.
आत्ता माझी तुमच्याबरोबर रिलेशनशिप नाहीये का?
तुमच्या पालकांसोबत, मित्रांसोबत, शिक्षकांसोबत तुमची “रिलेशनशिप” नाहीये का?............

तुमची बुद्धी तुमच्या हार्मोन्सनि निकामी करून टाकलीये.
मी म्हटलं “तू माझा मित्र आहेस”; म्हणजे मी तुझ्याशी शारीरिक गोष्टी करायला हव्यातच.
हे गरजेचं आहे का? हॅलो?
त्याशिवाय शक्य नाहीये का?
ठीकाय, तुम्ही एक मुलगी आहात, तुम्ही मैत्रीण असाल तरी मी तुम्हाला “गर्लफ्रेंड” म्हणू शकत नाही.
कारण ते वेगळ्या अर्थानं घेतलं जाईल.
हे असं कशामुळे होतंय तर, आपण शरीराधारित नात्यांना खूपच जास्त महत्व देत आहोत.
आपण हे समजायला हवं कि शरीराहूनही सखोल अशी नाती आहेत.
तुम्ही अशी प्रगल्भ नाती लोकांसोबत, तुमच्या शारीरिक गुंतवणुकी शिवायही ठेवू शकता.
नाही का? शक्यय कि नाही?
हो, शारीरिक नातं कुणासाठी गरजेचं असू शकत, ते ठीक आहे. ती तुमची निवड असेल.
पण ते शक्य आहे एका मर्यादित चौकटीतून.
मात्र मैत्री आणि नाती ही वेगवेगळ्या स्तरांवर, असंख्य लोकांबरोबर शक्य आहेत. हो कि नाही?

तुम्ही जिवाभावाची नाती हजारो लोकांबरोबर ठेवू शकता. माझी अत्यंत जिवाभावाची नाती आहेत...