सद्गगुरु: एकदा कुटुंबासोबत रात्रीचे जेवण घेत असताना, शंकरन पिल्लेने जाहीर केले, की तो लग्न करणार आहे. प्रत्येकाने विचारले, “काय! तू कोणासोबत लग्न करणार आहेस”  

शंकरन पिल्ले म्हणाला, “ मी आपल्या शेजारी राहणार्‍या लुसीशी लग्न करणार आहे.”

वडील म्हणाले, “काय? तू त्या घाणेरड्या लुसीशी लग्न करणार आहेस? आपल्याला तिचे पालक कोण हे सुद्धा माहिती नाही.”

त्याची आई म्हणाली, “काय? तू त्या घाणेरड्या लुसीशी लग्न करणार आहेस? तिला काही वारसा देखील नाही.”

काका म्हणाले, “काय? तू त्या घाणेरड्या लुसीसोबत लग्न करणार आहेस? तिचे केस किती घाणेरडे आहेत.”

काकूने सुद्धा संभाषणात भाग घेतला आणि ती म्हणाली,“काय? तू त्या घाणेरड्या ल्युसीसोबत लग्न करणार आहेस? ती किती वाईट मेकअप करते.”

छोट्या पुतण्यानेसुद्धा त्याचा वाटा उचलला आणि तो म्हणाला, काय? तू त्या घाणेरड्या ल्युसीसोबत लग्न करणार आहेस? तिला क्रिकेटमधले काहीही कळत नाही.”

शंकरन पिल्ले मात्र त्याच्या मताशी ठाम राहून  म्हणाला, “होय, मी ल्युसीसोबत लग्न करणार आहे कारण त्यात एक मोठा फायदा आहे.”

“तो कोणता?” सर्वांनी विचारले.

“तिला कुटुंबच नाहीये.”

आपण कुटुंब का निर्माण  करतो?

जेंव्हा मानवी मूल जन्माला येते, त्यावेळेस इतर प्राणी जसे जन्माला येतात तसे ते येत नाही. त्याचं संगोपन, प्रशिक्षण आणि त्याला साकार करण्याची गरज असते. म्हणूनच कुटुंबाची गरज भासली. मनुष्याच्या योग्य वाढीसाठी कुटुंब हा एक मुलभूत असा, अतिशय सहायक आधार आहे. पण कित्येक लोकांसाठी, कुटुंब सहायक न ठरता एक अडथळाच बनतो.  ती सहाय्यक प्रणाली न राहता, एका अर्थी तो एक किचकट गुंतागुंत बनते. पण मुळात कुटुंब रचनाच ही समस्या आहे म्हणून नाही, तर तुमचा त्याप्रती असलेला दृष्टीकोण जबाबदार आहे.

एका विशिष्ट प्रकारे कार्यरत असेल तरच कुटुंब सुंदर बनते, अन्यथा ती अतिशय त्रासदायक आणि किचकट गोष्ट होऊ शकते.

तुमच्या भल्यासाठी तयार केलेली एखादी गोष्ट तुमच्यासाठी तोट्याची कशी ठरते याचे कुटुंब एक उत्तम उदाहरण आहे. अनेक वेगवेगळ्या मार्गाने असे घडत असलेले तुम्ही बघत असता. उदाहरणार्थ, ऐश्वर्य म्हणजे हीतकारक असलं पाहिजे होतं, परंतु बहुतेक लोक त्याचा वापर विषासारखा करतात. शिक्षण म्हणजे कल्याणकारक गोष्ट असली पाहिजे होती, परंतु सुशिक्षित लोकच आज या पृथ्वीचा विनाश करण्यात मग्न आहेत. आपल्या भल्यासाठी आपल्याला देण्यात आलेल्या गोष्टी आपल्यासाठी एक मोठा आशीर्वाद ठरल्या असत्या, पण त्याऐवजी आज त्याच गोष्टी मानवाचं अस्तित्वच धोक्यात घालत आहेत.  

त्याचप्रमाणे, कुटुंब, जे आपल्याला सहायक आणि प्रगतीचे साधन बनायला हवे होते, तेच आज कित्येक लोकांसाठी एक मोठे किचकट गुंतागुंत आणि अडथळा बनत आहे. एका विशिष्ट प्रकारे कार्यरत असेल तरच कुटुंब सुंदर बनते, अन्यथा ती अतिशय त्रासदायक आणि किचकट गोष्ट होऊ शकते.

कुटुंब म्हणजे केवळ कर्तव्य नव्हे

कुटुंब म्हणजे एकमेकांवर अवलंबून असणे नव्हे, तर ती एक तुम्ही तयार केलेली विशिष्ट भागीदारी आहे. दोन्हीही पक्ष स्वेच्छेने, एकाच दिशेने वाटचाल करण्यास राजी असतील तरच भागीदारीच्याअस्तित्वाला काही अर्थ आहे. जर दोन्ही भागीदार एकमेकांच्या भल्यासाठी काळजी वाहत असतील, तरच भागीदारी अर्थपूर्ण होते. जर कुटुंबाच्या संदर्भात, व्यवसायाच्या संदर्भात, किंवा अध्यात्माच्या संदर्भात किंवा आणखी कशाच्याही संदर्भात, तुम्ही केवळ स्वतःचाच विचार करत राहिलात, तर त्या व्यक्तीसाठी भागीदारी निरर्थक आहे. अशा दोन व्यक्ती जर एकत्र राहतील तर दोघंही एकमेकांसाठी मोठं किचकट परिस्थिती निर्माण करतील. 

कर्तव्य म्हणून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत रहात नाही. कुटुंबियांबरोबर प्रेम आणि वात्सल्याचे बंध आहेत म्हणून तुम्ही कुटुंबासोबत रहाता.

कर्तव्य म्हणून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत रहात नाही. कुटुंबियांबरोबर प्रेम आणि वात्सल्याचे बंध आहेत म्हणून तुम्ही कुटुंबासोबत रहाता. जर प्रेमाचे अनुबंध असतील तर काय केलं पाहिजे आणि काय नाही ते तुम्हाला कोणी सांगायची गरज भासत नाही. जे जे आवश्यक आहे ते ते तुम्ही कराल.

अधिक प्राप्तीची इच्छा

पण केवळ तुम्ही कोणासोबत किंवा काही व्यक्तींच्या गटासोबत प्रेमाचे संबंध निर्माण केलेत, म्हणून तुम्ही अधिक काही प्राप्त करण्याची इच्छा करायची नाही असा त्याचा अर्थ नाही. तुमच्या भोवताली असलेल्या लोकांसाठी तुम्हाला करता येण्यासारखी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे, एका मनुष्याला शक्य तितके, तुम्ही स्वतःला, सर्वोच्च मार्गाने घडवा. तुम्ही त्या दिशेने वाटचाल करायलाच हवी. तुम्ही जितके अधिक प्रगल्भ, विकसित व्हाल, तितके तुम्ही आजूबाजूच्या लोकांसाठी अधिक चांगले योगदान देऊ शकाल. जर कुटुंबातील सदस्यांना हे समजले नाही, तर ते असा विचार करतील, की तुम्हाला प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला सुद्धा त्यांच्याच पातळीवर अडकवून ठेवणे – त्याच सारख्याच संकुचित मर्यादा, त्याच सारख्याच समस्या आणि तुम्ही त्यापलीकडे सुटका करून घेऊ शकत नाही – परिस्थिती जर अशी असेल, तर ते कुटुंब नव्हे, ती एक गुंडांची टोळी झाली. सतत एकमेकांकडून एखादी गोष्ट कशी पिळून काढता येईल हे ह्या विचारात असलेली गुंडांची टोळी चालवत असाल, तर ते कुटुंब नव्हे. एकमेकांना सर्वोत्तम असं कसं देता येईल हा विचार करणार्‍या लोक असतील तरच ते कुटुंब म्हणता येईल.

https://www.youtube.com/watch?v=Bp7PQxtUFHA&t=3s